शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान भाजपामध्ये बंडाळी, आमदार म्हणाले हे मंत्रिमंडळ सवर्णविरोधी

By बाळकृष्ण परब | Updated: February 9, 2021 13:06 IST

Bihar Cabinet Expansion News : काठावरचे बहुमत मिळवून बिहारमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे.

पाटणा - काठावरचे बहुमत मिळवून बिहारमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराला वादविवादांचे ग्रहण लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपात धुसफूस सुरू झाली असून, भाजपाच्या एका आमदाराने आपल्याच पक्षाच्या मंत्रिमंडळावर जोरदार टीका केली आहे.भाजपाचे आमदार ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनी मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान आपल्याच पक्षाच्या मंत्रिमंडळावर टीका केली आहे. बाढ मतदारसंघातील भाजपा आमदार ज्ञानेंद्र सिंह यांनी आपला पक्ष आणि नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काही नेत्यांना भाजपाला आपल्या खिशातील पक्ष बनवले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ना क्षेत्रिय समीकरणे विचारात घेतली आहेत ना सामाजिक समीकरणे लक्षात घेतली आहेत. आज झालेला मंत्रिमंडळ विस्तार हा सवर्णविरोधी आहे, या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांनी आपल्या मर्जीतल्या लोकांची वर्णी लावली आहे. तर अन्य नेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात लॉबिंग होत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, बिहारचे उपमुख्यमंत्रिपद अशा व्यक्तीला दिली गेले आहे ज्याला काहीच माहिती नाही. राजपूत समाजातून येणाऱ्या ज्ञानू यांनी आरोप केला की, काही लोकांनी भाजपाला केवळ यादव आणि बनिया लोकांचा पक्ष बनवले आहे. पक्षातील अनेक आमदार या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज आहे. आता आम्ही यावर चर्चा करून पुढे निर्णय घेऊ.बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर नव्या सरकारचा शपथविधी झाल्यावर मंगळवारी ८४ दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक जुन्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाMLAआमदारPoliticsराजकारण