शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लाट नसल्याने शिवसेनेसमोर मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 00:51 IST

२०१४ सारखी लाट नसल्याने यंदा शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे.

- नजीर शेखऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, शिवसेनेचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यात चौरंगी लढत होत आहे. २०१४ सारखी लाट नसल्याने यंदा शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे.चारवेळा विजयी झालेले खासदार खैरे हे शिवसेनेचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, यंदा त्यांच्याविरुद्ध वातावरण असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांना काँग्रेसचे आ. झांबड यांनी आव्हान दिले आहे. मात्र, एमआयएमचे आ. जलील यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेससमोर अडचणी आहेत. दुसऱ्या बाजूला आ. जाधव यांनी खैरेंविरुद्ध आघाडी उघडत दंड थोपटल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. मतदारसंघात एक गोष्ट दिसत आहे. आ. झांबड म्हणतात, माझी लढत खा. खैरे यांच्याशी आहे. आ. जलील म्हणतात, आम्ही शिवसेनेविरुद्ध लढा देत आहोत, तर आ. जाधव म्हणतात माझा मुकाबला केवळ खैरे यांच्याशी आहे. मात्र, शिवसेनेकडून आमची लढत एमआयएमशी असल्याचे मुद्दामहून सांगितले जात आहे.खैरे यांना आ. जाधव यांचा धोका आहे, तर आ. झांबड यांना आ. जलील यांची भीती आहे. आ. जाधव यांची भिस्त ही मुख्यत: ग्रामीण मराठा मतदारांवर आहे. आ. जलील यांना वंचित आघाडीमुळे दलित समाजाची ६० ते ७० टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मुस्लिम समाजात त्यांच्याविषयीची नाराजी प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुस्लिम समाजाची एमआयएमला भरभरून मतेमिळणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे.शहरातील कचरा, पाणी समस्या आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धची नाराजी याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार आ. झांबड यांना होऊ शकतो. राष्टÑवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचारात उतरल्याने काँग्रेसचे झांबड यांची बाजू भक्कम झाली आहे. मतांची विभागणी आणि जातीय ध्रुविकरण कसे होते, यावर या तिरंगी लढतीचे भवितव्य अवलंबून आहे.>शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीचा हा किल्ला अभेद्य आहे. आतापर्यंत अनेकांनी हा किल्ला भेदण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. आगामी काळात शेतकºयांच्या प्रश्नावर तसेच पाणी आणि रस्ते यावर आपला भर असेल.- चंद्रकांत खैरे,उमेदवार शिवसेना>गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यात विकासकामे झालीच नाहीत. कचरा आणि पाणीटंचाईने औरंगाबादकर वैतागले आहेत. शेतकºयांची कर्जमाफी झालीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही युतीच्या विरोधात वातावरण आहे. आता बदल होणारच.- आ. सुभाष झांबड,उमेदवार, काँग्रेस>कळीचे मुद्देऔरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांमध्ये सरकारविषयी नाराजी.मुद्यांवर फारसा प्रचार नाही. एकमेकांविरुद्ध असणाºया घटकांना आपल्याकडे वळविण्याच्या गणितावर भर.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद