शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

काँग्रेसचा मंत्री पडला भारी? किरण बेदींना पाँडिचेरीच्या राज्यपाल पदावरून हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 21:54 IST

Kiran Bedi Removed As Puducherry Lt Governor Amid Congress Crisis: काँग्रेसने बेदी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच बेदी या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता.

पाँडिचेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी यांना पदावरून हटविण्यात आले आहे. तेलंगानाचे राज्यपाल डॉ. तामिळीसाई सुंदरराजन यांच्याकडे पाँडिचेरी राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. (Kiran Bedi has been removed as Lieutenant-Governor of Puducherry, Rashtrapati Bhavan said in a statement released late Tuesday night.)

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पाँडिचेरीमध्ये (Puducherry) चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणसामी (V. Narayanasamy) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. ०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसची सहकारी असलेल्या डीएमकेने ४ जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता.

यामुळे काँग्रेसने बेदी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच बेदी या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे माजी मंत्री नमस्सीवायम यांनी बेदी यांना हटविण्याची अट ठेवत गेल्या महिन्यात दोन माजी आमदारांसह भाजपात प्रवेश केला होता. त्यांना भाजपाने शब्द दिला होता. यावरून बेदी यांना हटविण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे. 

ए नमस्सीवायम आणि ई थिप्पाईंजन यांनी गेल्या महिन्यात 25 जानेवारीला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. दोघांनीही भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर आणखी काही आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

दुसरीकडे एनआर काँग्रेसने ७ आणि मित्रपक्ष असलेल्य एआयएडीएमकेने ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र नायब राज्यपाल किरण बेदी यांनी भाजपाच्या तीन जणांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे ३० सदस्यीय विधानसभेची सदस्यसंख्या वाढून ३३ झाली होती.दरम्यान, पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यावर काम करू देत नसल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे किरण बेदींविरोधात पत्र दिले होते. नायब राज्यपालांकडून अधिकाऱ्यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आम्ही मोकळ्या वातावरणात काम करू शकत नाही आहोत, असा आरोप नारायणसामी यांनी केला होता.

टॅग्स :Kiran Bediकिरण बेदीBJPभाजपाcongressकाँग्रेस