शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
2
सभांऐवजी शाखा भेटींवर भर, ठाकरे बंधूंची हटके रणनीती; 'शिवतीर्था'वर ११ तारखेला उद्धव-राज गर्जना
3
VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री संतापली! प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे घराला आग, कार्यकर्त्यांना सुनावलं
4
अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?
5
"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त
6
महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार
7
Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद
8
केंद्र सरकारचा 'X' ला शेवटचा इशारा! 'Grok AI' मधील अश्लील मजकूर हटवण्यासाठी दिली डेडलाइन
9
अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 
10
"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत
11
Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..!
12
खरंच किंग कोहलीनं पळ काढला? संजय मांजरेकरांचं कसोटीतील ‘विराट’ निवृत्तीवर मोठं वक्तव्य, म्हणाले…
13
भारत फिरायला आली अन् 'इथलीच' होऊन गेली; चक्क ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात पडली परदेशी तरुणी!
14
एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
16
फक्त एका कुपनच्या जोरावर जगाला लुटणारा 'महाठग'; आजही त्याच मॉडेलवर चालतात मोठमोठे स्कॅम
17
युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी
18
साखरपुडा झाला, पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
19
बंटी जहागीरदार कुठे पोहोचला? हत्या करणाऱ्यांना लोकेशनची माहिती देणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी कसे शोधले?
20
काहीही केलं तरी वजन कमीच होईना... 'रताळं' ठरेल सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन भवनातील वाद; राजेंद्र पाटणी, भावना गवळींवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 11:41 IST

Bhawana Gawali, Rajendra Patni News खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम शहर पोलिसांत परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या.

ठळक मुद्देखासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात सभागृहाबाहेर कडाक्याचे भांडण झाले.भादंविचे कलम ५०६ अन्वये दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

वाशिम : प्रजासत्ताक दिनी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी सभागृहाबाहेर झालेल्या वादानंतर खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम शहर पोलिसांत परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. त्यावरून भादंविचे कलम ५०६ अन्वये दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांची भूमिका तटस्थ असून, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी कायदा, सुव्यवस्था धोक्यात येईल, असे वर्तन करू नये; अन्यथा गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिला. २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी जिल्हा विकासावर चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वीच काही कारणांवरून खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात सभागृहाबाहेर कडाक्याचे भांडण झाले. भावना गवळी यांनी दमदाटी केली, ‘माझ्याशी खेटे घेऊ नका, तुम्हाला पाहून घेईल, संपवून टाकीन,’ अशी धमकी दिल्याची तक्रार आमदार पाटणी यांनी शहर पोलिसांत दाखल केली, तर दुसरीकडून खासदार गवळी यांनीही तक्रार दाखल करत राजेंद्र पाटणी यांनी दमदाटी केली, ‘तू आणि बाजोरीया वाशिम जिल्ह्यात कसे फिरता तेच पाहतो,’ असे म्हणत अर्वाच्च भाषेत बोलून महिला खासदाराचा अपमान केला. पाटणी हे माणसे लावून माझ्यावर व सहकाऱ्यांवर हल्ला करायला लावू शकतात, असे तक्रारीत नमूद केले. परस्परांविरुद्ध दाखल अशा आशयाच्या तक्रारींवरून वाशिम शहर पोलिसांनी दोन्ही लोकप्रतिनिधींवर भादंविचे कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

दोन्ही पक्षांमधील २० कार्यकर्त्यांवर कारवाईखासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात वाद झाल्याचे पडसाद २६ व २७ जानेवारी रोजी जिल्हाभरात उमटले. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ, प्रतिमेचे विद्रुपीकरण, व्यापारपेठ बंद करणे यासारखी आंदोलने केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी भाजप व शिवसेनेतील प्रत्येकी १० कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेशान्वये कलम १३५ची कारवाई केली. आपसातील वाद सामंजस्याने मिटवा, कोणीही जनतेस वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे वाशिम शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक धृवास बावनकर यांनी सांगितले. 

...अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही - परदेशी

भावना गवळी आणि राजेंद्र पाटणी यांनी परस्परांविरुद्ध वाशिम शहर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारींवरून दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन पोलिसांना सहकार्य करावे. जाळपोळ किंवा अन्य स्वरूपातील आंदोलने करून शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिला आहे.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीRajendra Patniराजेंद्र पाटणीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा