शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

स्थायी समिती सभापती पदावरून वाद चव्हाट्यावर; उल्हासनगरात शिवसेना-रिपाइं युतीत फूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 17:30 IST

Ulhasnagar Politics: स्थायी समिती सभापती पदाच्या वादातून शिवसेना-रिपाइं युतीत उभी फूट पडून उपमहापौर भगवान भालेराव भाजप गोटात सहभागी झाले.

सदानंद नाईक उल्हासनगर : स्थायी समिती सभापती पदाच्या वादातून शिवसेना-रिपाइं युतीत उभी फूट पडून उपमहापौर भगवान भालेराव भाजप गोटात सहभागी झाले. तशी माहिती स्वतः भालेराव यांनी पत्रकारांना दिली. १५ एप्रिल रोजी होणारी स्थायी समिती सभापती निवडणूक पुढे ढकलली असून त्यावादातून रिपाइं शिवसेना महाआघाडीतुन बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. 

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना, दिड वर्षांपूर्वी शिवसेना महाआघाडीने भाजपातील ओमी समर्थक काही नगरसेवकांना फोडून महापौर व उपमहापौर निवडून आणले. महापौर पदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान तर उपमहापौर पदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आले. त्यानंतरच्या स्थायी समिती सभापती, विशेष व प्रभाग समिती सभापती पदे शिवसेना आघाडीकडे आली. दरम्यान महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप समर्थक मात्र साई पक्षाचे समिती सदस्य गजानन शेळके यांना शिवसेना आघाडीने आपल्याकडे घेतल्याने, स्थायी समिती मध्ये शिवसेना आघाडी व भाजपचे प्रत्येकी ८ अशी समसमान मते (सदस्य) झाले. शिवसेना आघाडी कडून रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव सभापती पदासाठी इच्छुक होते.

 महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक १५ एप्रिल रोजी तर अर्ज दाखल करण्याची १२ एप्रिल तारीख होती. समिती सदस्यांची फाटाफूट होऊ नये म्हणून, शिवसेना आघाडीने ठाणे जिल्ह्यातील एका फार्म हाऊस मध्ये शिवसेना आघाडीच्या समिती सदस्यांना ठेवले. तर भाजपने पक्षाच्या समिती सदस्यांना गोवा दर्शनासाठी नेले. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नगरविकास विभागाने स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक पुढे ढकलली. तसेच सभापती पदासाठी इच्छुक असलेली रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव यांना शिवसेना आघाडीने पद देण्यास नकार दिल्याचे समजते. यातून भालेराव भाजपच्या गोटात गेल्याचे बोलले जाते. भालेराव यांनी भाजपचे नेते व विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन स्थानिक राजकीय परिस्थिती समजून सांगितली. भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी देवेन्द्र फडणवीस व भालेराव यांच्या भेटीला दुजोरो दिला. 

शिवसेना विकास आघाडी कायम....शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी

 शहरातील शिवसेना महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेसह काँग्रेस, रिपाइं, पीआरपी, राष्ट्रवादी पक्षाचा समावेश आहे. त्यापैकी रिपाइंचे भगवान भालेराव हे भाजप गोटात सामिल झाल्याचे समजले. त्यांच्याकडे उपमहापौर पद असताना, स्थायी समिती सभापती पद मागणे उचित नाही. त्यापेक्षा शिवसेना आघाडीला सभापती पद नको. अशी पक्षाची भूमिका असून शिवसेना आघाडी कायम आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाShiv Senaशिवसेना