शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांचा मतदान यंत्रांवर अविश्वास; पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 07:01 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ मतदारसंघांत मतदान पार पडल्यानंतर काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी रविवारी मतदान यंत्रांवर पुन्हा एकदा अविश्वास व्यक्त केला

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ मतदारसंघांत मतदान पार पडल्यानंतर काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी रविवारी मतदान यंत्रांवर पुन्हा एकदा अविश्वास व्यक्त केला आणि निवडणूक नि:ष्पक्ष व विश्वासार्ह व्हावी, यासाठी किमान ५० टक्के मतदान यंत्रांमधील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी व्हायलाच हवी, ही मागणी घेऊन पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालायात जाण्याचे ठरविले.याबाबतीत विरोधी पक्षांच्या वतीने हिरिरीने पुढाकार घेणारे तेलगु देसम पक्षाचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एम. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन पहिल्या टप्प्यातील मतदानात मतदान यंत्रे मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्याची तक्रार केली होती. तोच विषय पुढे नेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बैठक घेऊन आपली रणनीती ठरविली व नंतर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आडमुठेपणावरही टीका केली.नायडू म्हणाले की, आयोग प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सरधोपटपणे निवडलेल्या एका मतदानयंत्रातील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी करण्याचे ठरविले होते. त्याऐवजी किमान ५० टक्के यंत्रांची पडताळणी व्हावी यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. न्यायालयाने पाच यंत्रांच्या पडताळणीचा आदेश दिला. पण खास करून पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर न्यायालयाच्या आदेशाने आमचे समाधान झालेले नाही. त्यामुळे आधीच्या आदेशाचा फेरविचार करण्यासाठी पुन्हा न्यायालयात जाऊ.काँग्रेसतर्फे डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, पुन्हा न्यायालयात जाण्यासोबतच आम्ही यावर देशव्यापी आंदोलन करू. पहिल्या फेरीच्या मतादानाच्या वेळी मतदानयंत्रांबद्दल ज्या मोठया प्रमाणावर तक्रारी आल्या त्या पाहता ५० टक्के ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणीची अधिक गरज निर्माण झाली आहे. निवडणूक आयोग याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचेही ते म्हणाले.दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, मतदानयंत्रांवरचा लोकांचा विश्वास उघड चालला आहे व त्यांना पुन्हा पूर्वीसारखे मतपत्रिकेने मतदान हवे आहे. पण आता ऐनवेळी हा बदल करण्यास वेळ अपुरा असल्याने ५० टक्के ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी हाच उत्तम पर्याय आहे. मतदानयंत्रांमध्ये यांत्रिक बिघाड होत नाही तर भाजपला विजयी करण्यासाठी प्रोग्रामिंग करून यंत्रांमध्ये हेराफेरी केली जात आहे, असा त्यांनी आरोप केला.>‘ही तर पराभवाची कबुली’विरोधी पक्षांची ही पत्रकार परिषद म्हणजे ‘महागठबंधन’ची निवडणुकीआधीच पराभवाची कबुली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली. प्रवक्ते जीएलव्ही नरसिंह राव म्हणाले की, विरोधी पक्षांकडे सुशासनाचा कोणताही अजेंडा नाही. लोकांना स्फूर्ती देणारे नेतृत्व नाही. नकारात्मकता हेच या पक्षांना एकत्र आणणारे समान सूत्र आहे. विकासाच्या वाटेवर निघालेल्या देशाला मागे खेचणे एवढेच त्यांचे काम आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय