औरंगाबाद - गतवर्षी राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने भल्या पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात भूकंप आणला होता. मात्र भल्या पहाटे शपथ घेतलेले हे सरकार अल्पजीवी ठरले होते. दरम्यान, या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या सरकारबाबत विचारले असता त्यांनी त्याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना पहाटेच्या शपथविधीबाबत विचारण्यात आले तेव्हा फडणवीस म्हणाले की, आता ज्यावेळेस सरकार पाहायला मिळेल तेव्हा ते पहाटेचे सरकार पाहावे लागणार नाही तर योग्य वेळेचे सरकार पाहायला मिळेल. दरम्यान, त्या अल्पकालीन सरकारबाबत एक पुस्तक लिहित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.राज्यातील सरकार अजून चार वर्षे काय २० वर्षे चालेल या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी कितीही स्वप्न पाहिली तरीदेखील त्यांना हे माहिती आहे की, जनतेने त्यांना निवडून दिलेले नव्हते. हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे. त्यामुळे मी त्याबाबत अधिक काही बोलणार नाही.
पहाटेच्या सरकारबाबत फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता पहाटेचे नाहीतर...
By बाळकृष्ण परब | Updated: November 23, 2020 12:59 IST
Devendra Fadanvis News : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पहाटे शपथ घेऊन स्थापन झालेल्या सरकारबाबत विचारले असता त्यांनी त्याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
पहाटेच्या सरकारबाबत फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता पहाटेचे नाहीतर...
ठळक मुद्देआता ज्यावेळेस सरकार पाहायला मिळेल तेव्हा ते पहाटेचे सरकार पाहावे लागणार नाहीतर योग्य वेळेचे सरकार पाहायला मिळेलत्या अल्पकालीन सरकारबाबत एक पुस्तक लिहित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले