शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

"महाराष्ट्रात भाजपाला पक्षविस्ताराची मोठी संधी," देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 16:06 IST

Devendra Fadnavis News: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला राज्यात असलेल्या पक्षविस्ताराच्या संधीबाबत मोठे विधान केले आहे.

ठळक मुद्देराज्यात सत्तेवर असलेले तीन पक्षांचे सरकार हे भाजपासाठी राज्यात पक्षविस्तार करण्याची संधी आहे जिथे जिथे भाजपाविरोधात सर्व पक्ष एकत्र आले आहेत, तिथे तिथे भाजपाचा विस्तार होतो आमच्यासाठी राजकारण म्हणजे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा एक मार्ग

मुंबई - २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपाला निवडणूक जिंकूनही विरोधी पक्षात बसावे लागले होते. तेव्हापासून राज्यातील सत्तेत पुन्हा येण्यासाठी भाजपा(BJP) प्रयत्नशील आहे. मात्र वेळोवेळी भाजपाचे मनसुबे उधळले जात आहेत. तरीही राज्यातील सत्तांतरासाठी आणि पक्षविस्तारासाठी भाजपा ने आशावादी आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी भाजपाला राज्यात असलेल्या पक्षविस्ताराच्या संधीबाबत मोठे विधान केले आहे. (Devendra Fadnavis said "Great opportunity for BJP to expand in Maharashtra")

आज मुंबईत झालेल्या कृपाशंकर सिंह यांच्या भाजपामधील प्रवेशावेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राज्यात सत्तेवर असलेले तीन पक्षांचे सरकार हे भाजपासाठी राज्यात पक्षविस्तार करण्याची संधी आहे. भाजपासाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील पक्षविस्तार करण्याची ही मोठी संधी आहे.  जिथे जिथे भाजपाविरोधात सर्व पक्ष एकत्र आले आहेत, तिथे तिथे भाजपाचा विस्तार होतो. असे विविध राज्यांमधून दिसून आले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आमच्यासाठी राजकारण म्हणजे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा एक मार्ग आहे. आताच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र तो प्रश्न आम्ही लावून धरला. भाजपा हा राजकीय स्पेस व्यापणारा पक्ष आहे आणि महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आल्याने अशी स्पेस निर्माण झालेली आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांचेही देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. कृपाशंकर सिंह यांचा पक्षप्रवेश म्हणजे एक विचारसरणी सोडून दुसऱ्या विचारसरणीमधील प्रवेश आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. मात्र कलम ३७० च्या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना जागृत झाली. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादाचा विचार करून भाजपामध्ये प्रवेश केला, अशा शब्दांत त्यांनी कृपाशंकर सिंह यांचे कौतुक केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण