शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार? ममता की भाजपा; जाणून घ्या जनमताचा कौल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:06 IST

जनमत चाचणीचा अंदाज, पुडुचेरीमध्ये सत्तांतराचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता कायम राहणार असल्याचा अंदाज एबीपी-सी व्हाेटर यांच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये हाेणाऱ्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार असून, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये सत्तांतराचा अंदाज या चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. 

भारतीय जनता पार्टीसाठी पश्चिम बंगाल येथील निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे. तेथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काॅंग्रेससाेबत थेट टक्कर आहे. मात्र, जनमत चाचणीनुसार सत्ता ममतांच्याच पारड्यात जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांपैकी तृणमूल काॅंग्रेसला १४८ ते १६४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. ममतांना भाजपकडून यंदा कडवे आव्हान मिळणार असून, भाजपच्या वाट्याला ९२ ते १०८ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काॅंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला ३१ ते ३९ जागा मिळू शकतात. तृणमूल काॅंग्रेसला ४३ टक्के, भाजपला ३८ टक्के, तर काॅंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला १३ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत ममतांना २११ जागा मिळाल्या हाेत्या. मात्र, यंदा सत्ता कायम राखण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला, तरीही माेठ्या प्रमाणात जागा घटण्याची शक्यता आहे. हीच स्थिती काॅंग्रेस आणि डाव्या आघाडीबाबत आहे. गेल्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपने प. बंगालकडे मार्चा वळविला हाेता. भाजपने २०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला आहे. 

आसाममध्ये भाजपच जनमत चाचणीनुसार आसाममध्ये भाजपचीच सत्ता येईल, असा अंदाज आहे. आसाममधील १२६ जागांपैकी एनडीएला ६८ ते ७६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काॅंग्रेसच्या महाआघाडीला ४३ ते ५१ जागा मिळण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये सत्ताधाऱ्यांनाच काैलकेरळमध्ये सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा संधी मिळणार आहे, असा जनमत चाचणीचा अंदाज आहे. केरळमध्ये सत्ताधारी डाव्या आघाडीला १४० पैकी ८३ ते ९१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काॅंग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीला ४७ ते ५५ जागा मिळतील, असा अंदाज आहे. भाजपला मात्र केवळ ० ते २ जागा मिळतील, अशी शक्यता आहे. पुडुचेरीमध्येही सत्ता परिवर्तन हाेण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी एकूण ३० जागांपैकी ‘एनडीए’ला १७ ते २१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काॅंग्रेस आघाडीला ८ ते १२ जागा मिळतील, असा अंदाज आहे. 

तामिळनाडूत सत्ता परिवर्तनतामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन हाेण्याचा अंदाज आहे. एकूण २३४ जागांपैकी सत्ताधारी ‘एआयएडीएमके’ आघाडीला ५८ ते ६६ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर ‘डीएमके’ १५४ ते १६२ जागा मिळवून सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर हाेत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यासाठी ‘डीएमके’चे नेते एम. के. स्टॅलीन यांनी काॅंग्रेससाेबत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला माेठे यश मिळेल, असा अंदाज आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा