शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

विरोधकांच्या एकजुटीची सत्त्वपरीक्षा, आज राज्यसभा उपसभापतीपदाची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 11:50 IST

सत्ताधारी भाजपतर्फे जदयूचे राज्यसभा सदस्य हरिवंश नारायण सिंह तर विरोधकांकडून काँग्रेसचे बीके हरिप्रसाद मैदानात

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी आज मतदान होणार असून विरोधकांनी संख्याबळ नसतानाही उमेदवार दिला आहे. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची एकजुट पहायला मिळणार आहे. सत्ताधारी भाजपतर्फे जदयूचे राज्यसभा सदस्य हरिवंश नारायण सिंह तर विरोधकांकडून काँग्रेसचे बीके हरिप्रसाद मैदानात उतरले आहेत. आज दुपारी 12 वाजता मतदान प्रक्रिया सुरु होणार आहे.   गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावेळी दोनही बाजुंकडील काही घटक पक्षांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्यसभेतही हे पक्ष अनुपस्थित राहतील की मते फुटतील याची उत्सुकता दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधांनीही आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, संख्याबळ पाहता हरिवंश सिंह याची निवड पक्की मानली जात आहे.   बुधवारी विरोधकांपैकी एक पक्ष असलेल्या बीजेडीने भाजपप्रणित उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने विरोधकांना मोठा झटका बसला आहे. त्यातच आपच्या खासदारांनीही राहुल गांधी स्वत: केजरीवाल यांच्याशी बोलल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला मत देऊ, अशी  अट ठेवली आहे. तसेच भाजपवर नाराज असलेल्या शिवसेनेनेही हरिवंश यांना पाठिंबा दिला आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनाच अनुमोदकाच्या भुमिकेत आहे. 

कोण राहणार अनुपस्थित? हरिवंश सिंह यांना मतदान करण्यासाठी जेडीयूच्या नितिश कुमार यांनी आपच्या केजरीवाल यांना फोन केला होता. मात्र, त्यांचा उमेदवार भाजपच्या पाठिंब्यावर उभा असल्याने केजरीवाल यांनी नकार दिला आहे. तसेच आपने काँग्रेसला घातलेली अट मान्य न झाल्यास आपसमोर अनुपिस्थत राहण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. याचबरोबर वायएसआर काँग्रेसचे 2, पीडीपी 2, डीएमकेचे 1 सदस्य अनुपस्थित राहू शकतात. यामुळे विजयासाठी लागणारे संख्याबळ कमी होईल. 

कोणाकडे किती संख्याबळ?   एनडीएचे 91 सदस्य, तीन स्वीकृत सदस्य, अमर सिंह, अन्नाद्रमुकचे 13, टीआरएसचे 6, आयएनएलडीचा एक असे मिळून 115 मते हरिवंश सिंह यांना पडण्याची शक्यता आहे. तर बीजेडीकडे 9 मते आहेत. नवीन पटनायक यांनीही समथर्न दिले आहे. वायएसआर काँग्रेसने समथर्न दिल्यास भाजपच्या उमेदवाराला 126 मते मिळू शकतात.   तर युपीएकडे काँग्रेसची 61 मते, तृणमूल आणि सपचे प्रत्येकी 13, टीडीपी 6, सीपीएम 5, बसप आणि डीएमकेचे प्रत्येकी 4, सीपीआयचे 2 आणि जेडीएसचे 1 असे संख्याबळ आहे. यामध्ये अपक्ष आणि स्वीकृत सदस्य मिळून हे संख्याबळ 111 होणार आहे.राज्यसभेमध्ये 244 सदस्य असतात. यामुळे विजयासाठी 123 मते आवश्यक आहेत.   

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक