शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गांधी कुटुंबियांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास; संजय राऊत यांचा आरोप

By मोरेश्वर येरम | Updated: January 7, 2021 10:34 IST

राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याबाबद अपशब्द वापरुन बोलणं ही काही आपली संस्कृती नाही, असं राऊत म्हणाले

ठळक मुद्देसंजय राऊत यांचा केंद्र सरकारवर आरोपविरोधक आगामी काळात फिनिक्स पक्ष्याप्रमाणं भरारी घेईल, अशा विश्वासराहुल गांधींबाबत अपशब्दाचा वापर करणं चुकीचं असल्याचं मत

मुंबईदेशात गांधी कुटुंबिय आणि विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास दिला जातोय, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

"राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याबाबद अपशब्द वापरुन बोलणं ही काही आपली संस्कृती नाही. गेल्या अनेक दिवसांपासून गांधी कुटुंबियांना आणि विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास देण्याचं काम सुरू आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

कुणी कितीही प्रयत्न करा, काही साध्य होणार नाही"केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आम्ही सुद्धा आलो. गांधी कुटुंबिय देखील आले. पण कुणी कितीही प्रयत्न केला तरी काहीच साध्य होणार नाही. आगामी काळात विरोधीपक्ष फिनिक्स पक्ष्याप्रमाणं भरारी घेईल हा आपला आजवरचा इतिहास राहीला आहे", असंही राऊत म्हणाले. 

'सामना'मध्ये राहुल गांधींचं कौतुकशिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या आजच्या अग्रलेखात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं कौतुक करण्यात आलं आहे. "राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे, अशा शब्दांत 'सामना'तून राहुल यांचे कौतुक करण्यात आले आहे.

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट असल्याचंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. भाजपला मोदींशिवाय व काँग्रेसला गांधींशिवाय पर्याय नाही हे सत्य स्वीकारावे लागेल. काही काळासाठी गांधी दूर जातच पक्ष होता त्यापेक्षा जास्तच खाली घसरला, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना