शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीतील अंतर्गत पक्षांतराचा निर्णय तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:58 IST

Chagan Bhujbal : राष्ट्रवादीचे अध्यक्षदेखील मुख्यमंत्र्यांना भेटतात तेव्हा काही विशेष प्रश्न किंवा निर्णय असतील तर त्यावर चर्चा, सल्लामसलत करतात, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले.

नाशिक :  महाआघाडीत अंतर्गत कोणतेही पक्षांतर करण्यापूर्वी संबंधित  पक्षांतील पक्षश्रेष्ठींची संमती अत्यावश्यक आहे; परंतु राज्यातील अन्य पक्षांमधील बरेच नेते राष्ट्रवादीत यायला इच्छुक असले तरी त्याबाबत आताच काही सांगता येणार नसल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेब सानप यांच्यासारखे अनेक जण राष्ट्रवादीत यायला इच्छुक असले तरी महाआघाडीतील पक्षांतराबाबतचा निर्णय हे संबंधित पक्षांचे पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. पक्षांतराबाबत अनेकांच्या भेटीगाठी होत असतात, अन्य पक्षांमधील नेते, पदाधिकारीदेखील राष्ट्रवादीत यायला इच्छुक आहेत; मात्र त्याबाबत आताच काही बोलणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. नाशिक महानगरपालिका निवडणूक महाआघाडीने एकत्रित लढवायची की कसे, त्याबाबतचा निर्णय झालेला नसल्याचे ते म्हणाले. 

नाराज हा माध्यमांचा शब्दराज्यातील सरकारवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नाराज आहेत, या चर्चेत तथ्य नाही. नाराजी हा माध्यमांनी पसरवलेला शब्द आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, गोरगरिबांना न्याय द्यावा, हे कॉंग्रेसचे पूर्वीपासूनचे धोरण आहे. त्यामुळे या ध्येयधोरणाकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात काही वावगे नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्षदेखील मुख्यमंत्र्यांना भेटतात तेव्हा काही विशेष प्रश्न किंवा निर्णय असतील तर त्यावर चर्चा, सल्लामसलत करतात, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले.

प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना सर्व जागा लढवा, असे सांगत असले तरी त्यात काही चुकीचे नाही. कदाचित नाशिक मनपाची निवडणूक महाआघाडी एकत्रित लढवेल किंवा सर्व पक्ष स्वतंत्र लढून निवडणुकीनंतरही एकत्रित येऊ शकतील.     - छगन भुजबळ,     अन्न व नागरी पुरवठामंत्री

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस