शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

Remdesivir: दमणच्या कंपनीला महाराष्ट्रात रेमडेसिविर विक्रीस परवानगीच नव्हती; पत्रव्यवहारातून गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 5:38 AM

एफडीएची माहिती; सर्व पत्रांचा तपशील ‘लोकमत’कडे उपलब्ध. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एफडीए आयुक्तांना एक पत्र १५ एप्रिल रोजी दिले होते. त्या पत्रात त्यांनी ‘ज्या निर्यातदार कंपन्या महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास तयार आहेत व ज्यांनी महाराष्ट्र शासनाकडे परवानगी मागितली आहे, त्यांना तातडीने परवानगी द्यावी’, असे लिहिले होते.

- अतुल कुलकर्णी  मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश जैन यांच्यासाठी शनिवारी मध्यरात्री पोलीस ठाणे गाठले होते. मात्र, त्या कंपनीला महाराष्ट्रात इंजेक्शन विकण्यासाठी दीव दमण प्रशासनाचीच परवानगी नाही, हे समोर आले आहे. ही माहिती त्या कंपनीने स्वतः महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) कळवली आहे. त्यामुळे भाजपने सुरू केलेले राजकारण ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’, असे झाल्याचे चित्र आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एफडीए आयुक्तांना एक पत्र १५ एप्रिल रोजी दिले होते. त्या पत्रात त्यांनी ‘ज्या निर्यातदार कंपन्या महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास तयार आहेत व ज्यांनी महाराष्ट्र शासनाकडे परवानगी मागितली आहे, त्यांना तातडीने परवानगी द्यावी’, असे लिहिले होते. मात्र, त्या दिवसापर्यंत एकाही कंपनीने महाराष्ट्राकडे अशी परवानगी मागितली नव्हती. देशात जेवढ्या कंपन्या हे इंजेक्शन बनवतात त्या गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिव दमण याठिकाणी आहेत. महाराष्ट्रातल्या बीडीआर फार्मासिटिकल कंपनीने एफडीएकडे परवानगीबद्दल १६ एप्रिल रोजी तोंडी विनंती केली होती. त्यावर कागदपत्रांची वाट न पाहता त्याचदिवशी परवानगी दिली. शिवाय कागदपत्रे नंतर सादर करा, असेही प्रशासनाने सांगितले होते. त्याचदिवशी एफडीएने स्वतःहून सात कंपन्यांना रेमडेसिविर महाराष्ट्रात विकण्याची परवानगी द्यायला तयार आहोत. आपण कागदपत्रे सादर करावीत, असे पत्र पाठवले होते. 

त्यात ब्रुक फार्मा कंपनीही होती. १७ एप्रिलला एफडीएने ब्रुक फार्माला महाराष्ट्रात रेमडेसिविर विकण्याची परवानगी तर दिलीच, शिवाय तुम्ही तुमचा साठा राज्यात कशा पद्धतीने वितरित कराल तेदेखील कळवा, असे सांगितले. 

दीव दमण प्रशासनाने परवानगी दिली तर... १७ एप्रिल रोजी ब्रुक फार्माने एफडीए आयुक्तांना पत्र दिले. त्यात आम्ही ८ हजार इंजेक्शन्स येत्या काळात द्यायला तयार आहोत. मात्र, त्यासाठी दमण प्रशासनाची परवानगी लागेल. त्यांनी दिली तर आम्ही रेमडेसिविरचा पुरवठा करू, असे कळवले. १८ एप्रिलला एफडीएसह आयुक्तांनी पुन्हा ब्रुक फार्माला पत्र दिले. त्यात परवानगी दिल्याचे व वितरण आणि इतर तपशिलाची माहिती मागविली. हा सर्व पत्रव्यवहार ‘लोकमत’कडे आहे. 

राज्यात दिवसाला ५० ते ६० हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स लागत आहेत. दरेकर यांनी देऊ केलेला साठा एक दिवस पुरेल; पण तोदेखील आता ८ हजारांच्या वर गेलेला नाही. देशात सगळ्यात जास्त रेमडेसिविरचे उत्पादन गुजरातमध्ये होते. गुजरातने इंजेक्शन्स बाहेर विकायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी आपली ताकद गुजरातमध्ये लावावी आणि तेथून जास्तीत जास्त इंजेक्शन्स महाराष्ट्राला कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbai policeमुंबई पोलीस