शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

CoronaVirus: केंद्राचे क्रूर राजकारण! ऑक्सिजन आणण्यास गेलेल्या एक्स्प्रेसचा खोळंबा; अरविंद सावंतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 4:42 AM

Oxygen Express: ऑक्सिजन एक्स्प्रेसबाबत माध्यमांना अरविंद सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन रेल्वेने ऑक्सिजन आणण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार १९ तारखेला कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अजूनही फिरतेच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार क्रूर राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बुधवारी केला आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला कळंबोलीहून निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनला रेल्वे खात्याने फिरवत ठेवले आहे. जनतेच्या जिवाशी खेळण्याचा, विश्वासघात करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.ऑक्सिजन एक्स्प्रेसबाबत माध्यमांना अरविंद सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन रेल्वेने ऑक्सिजन आणण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार १९ तारखेला कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अजूनही फिरतेच आहे. आता ही एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. गाडीला जायचे आहे विशाखापट्टणमला पण ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागणार आहेत. महाराष्ट्राच्या पाठीत सुरा खुपसण्याचा हा प्रकार आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याप्रकरणी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही सावंत यांनी केली.

कोरोनाच्या संकटकाळात राज्यात विरोधी पक्षाकडून राजकारण सुरू आहे. गरिबांच्या जीवाशी खेळणारे राजकारण केले जात आहे. राज्याने केलेले चांगले काम दिसू नये, यासाठी घाणेरडे राजकारण सुरू आहे. असाच प्रकार भिलाई प्लांटमधून महाराष्ट्राला शंभर टक्के ऑक्सिजन पुरवण्याचे ठरले होते; मात्र आता ते केवळ साठ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. हा बदल कोणी आणि का केला, याचेही उत्तर मिळायला हवे. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी अडवणुकीचे राजकारण केले जात आहे. विरोधक सत्तेसाठी कासावीस झाले आहेत, असेही सावंत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत आहेत; पण त्यांनी चार तासाच्या अवधीत लाॅकडाऊन जाहीर केला होता. त्याचा फायदा जरूर झाला. आता तर डबल म्युटेशनचा विषाणू आहे. तो अधिक धोकादायक आहे. अजून बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की पंतप्रधानच लॉकडाऊनची घोषणा करतील, असे भाकीतही सावंत यांनी केले.

राज्य सरकारने खेळखंडोबा मांडला आहे - केशव उपाध्येnमहाराष्ट्रातील कोरोनाचा संकटात सर्व सहाय्य करण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. महाविकास आघाडी सरकारनेच या प्रश्नाचा खेळखंडोबा केला आहे. राज्य सरकारला ऑक्सिजन टँकरसाठी चालक देता आले नाहीत. nरेमडेसिविर, ऑक्सिजन अशा सर्व आघाड्यांवर राज्यातील सरकारने गोंधळ घालून ठेवला आहे. यातूनही केंद्र सरकार वाट काढण्याचा प्रयत्नात असताना आरोपबाजी केली जात असल्याचा पलटवार भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. मुळात सावंत यांना या विषयाची पुरेशी माहिती असल्याचे दिसत नाही. ज्या पद्धतीने राज्य सरकारने खेळखंडोबा मांडला आहे तसाच गोंधळ सावंत यांचा उडाल्याचा दिसतो, असेही उपाध्ये म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वेArvind Sawantअरविंद सावंत