शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्ण दाखविले ‘रोजगार हमी’चे मजूर, रोहयो मंत्र्यांच्या गावातच पैसे लाटल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 09:54 IST

Aurangabad News: मंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच असताना ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याचे दिसत आहे.

पैठण (औरंगाबाद) : रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री संदीपान भुमरे यांचे गाव असलेल्या पाचोड गावात धनदांडग्यांच्या नावावर रोहयोचे जॉबकार्ड तयार करून लाखो रुपये लाटल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. पैसे लाटताना चक्क कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्ण रोहयोच्या कामावर दाखविण्याचा प्रताप यंत्रणेने केला आहे. याबाबतचा भंडाफोड पैठणचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी दत्ता गोर्डे यांनी केला आहे. ‘लोकमत’ला त्यांनी ही कागदपत्रे दाखविली.मंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच असताना ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याचे दिसत आहे. याबाबत कारवाईची मागणी गोर्डे यांनी केली आहे. पैठण तालुक्यात मजुरांसाठी रोहयोंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर आहेत. या कामांवर मजुरांऐवजी धनदांडगे व्यापारी, वकील, कारखान्याचे माजी एम.डी., निमशासकीय कर्मचारी, प्राप्तीकर भरणाऱ्या व्यक्ती कामावर दाखवून मोठी रक्कम लाटल्याचा गंभीर प्रकारही घडल्याची कागदपत्रे गोर्डे यांनी दाखविली.  अंबड (जि. जालना) हद्दीत येणाऱ्या बीड बायपास ते साजेगाव हा रस्ता पाचोड ग्रामपंचायतीद्वारे रोहयोतून उरकण्यात आल्याचेही कागदपत्रांवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता मजुरांऐवजी यंत्र वापरून केला आहे, असा आरोप गोर्डे यांनी केला आहे. या रस्त्यावर कोरोना रुग्णांनी काम केल्याचे मस्टरवर दाखविण्यात आले आहे. यात सुरेश अशोक नरवडे, शिवकन्या नरवडे, विनोद नरवडे, संगीता सुरेश बडजाते, यश भुमरे हे कोरोना उपचार घेत असताना दुसरीकडे हेच रोहयोच्या कामावर दाखविण्यात आल्याचे पुढे आले आहे. प्राप्तीकर भरणारे पाचोडचे सिमेंट व स्टील विक्रेते सुरेश बडजाते आदींच्या नावावर मजुरांचे पैसे लाटण्यात आले आहेत. 

कामानंतर भरले मस्टर पाचोड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीआधी पाचोडमध्ये रस्त्यांची कामे झाली. यानंतर हीच कामे रोहयोत दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार सुरू आहे. कामे झाल्यानंतर बोगस मस्टर भरण्याचे काम सुरू असल्याचे गोर्डे यांनी सांगितले. अंबड तालुका हद्दीत रोहयोची कामे करण्याचा प्रताप पाचोड ग्रामपंचायतीने केल्याचे गोर्डे यांचे म्हणणे आहे. रोहयोंतर्गत मजुराने स्वतः काम मागणीचे पत्र द्यावे लागते. त्यानंतर रोजगार हमीतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मात्र, पाचोडमध्ये नियम डावलण्यात आले.  

...तर कारवाई करूरोहयोच्या कामात काही अनियमितता झाली असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. सदर मस्टरवर गावातील काही जणांचे चुकून नाव आले. मात्र, त्यांना पैसे दिलेले नाहीत. पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात रोहयोच्या माध्यमातून अनेक रस्ते करण्यात येत आहेत.- संदीपान भुमरे,रोहयो तथा फलोत्पादनमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार