शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...म्हणून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, फिल्डवर दिसत नाहीत; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 09:13 IST

CoronaVirus News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर का पडत नाहीत? विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. वर्षा निवासस्थानात बसून राज्यातील परिस्थिती कळत नाही. मुख्यमंत्र्यांनी मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय, अशा प्रकारची टीका विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे. गेल्या काही दिवसांत राज्यांत काही अप्रिय घटना घडल्या. रुग्णालयांत झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला नाही. दुर्घटनेत नातेवाईक गमावलेल्या व्यक्तींचं सांत्वन केलं नाही. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. या टीकेला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.कठोर निर्बंध १५ मेपर्यंत, मंत्रिमंडळाचा निर्णय; पोलीसही घेणार कडक भूमिकाकुठेही दुर्घटना घडली की तिथे लगेच पोलीस, अग्निशमन दल पोहोचतं. तिथली स्थानिक यंत्रणा तिथे पोहोचते. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू होतं. अशा ठिकाणी व्हीआयपी गेल्यावर तिथल्या मदतकार्यावर परिणाम होतो. मदतकार्यास विलंब होतो, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. राज्यात गेल्या काही दिवसांत काही अप्रिय घटना घडल्या. तिथे आरोग्यमंत्री, पालकमंत्री पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी तातडीनं मदत पोहोचवणं गरजेचं होतं. ती मदत तिथे पोहोचवली गेली, अशी माहिती आदित्य यांनी दिली.महाराष्ट्राची यंदा 'एकसष्ठी', महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची नियमावली जारीप्रत्येक वेळी टीव्हीवर येऊन सांत्वन होत नाही. प्रत्येक प्रसंगात टीव्हीवर येणं गरजेचंदेखील नसतं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला. 'दुर्घटनास्थळी आम्ही गेल्यावर तिथे गर्दी होते. पोलीस बंदोबस्तस वाढवला जातो. याचा परिणाम तिथे सुरू असलेल्या मदतकार्यावर होतो. आम्ही तिथे गेल्यावर माध्यमांशी बोलतो. त्यावेळी तिथे मदतकार्यात अडथळे येतात. ज्या ठिकाणी मदतकार्य वेगानं व्हायला हवं, त्याच गोष्टीला व्हीआयपींच्या भेटीमुळे उशीर होतो,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.एखाद्या परिसरात दुर्घटना घडल्यास तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतात. मदतकार्य वेगानं होईल यासाठी प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांत रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडल्या. त्यावेळी तिथले पालकमंत्री घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्री जिल्ह्यातील प्रशासनाशी संपर्क साधून मदतीचा आढावा घेतात. केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय राखण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात. जनरलनं वॉर रुममध्ये राहून काम करायचं असतं. इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही सध्या याच पद्धतीनं काम करत आहेत, असं आदित्य यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे