शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: "पुरवठा वाढविण्यासाठी कोरोना लस आयात करा, अन्य उत्पादकांना परवाने द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 08:11 IST

स्पष्ट सांगायचे म्हणजे मोदी सरकार सर्वार्थाने अपयशी ठरले आहे. लोकांना थाळीनाद करण्यास आणि दिवे उजळण्यास सांगून सरकारने विज्ञानाला कमी लेखत सुरक्षेच्या खोट्या भावनेला प्रेरित करणे अशी टीका काँग्रेस नेते पी. चिंदम्बरम यांनी केली आहे.

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरील टीकाकार म्हणून ओळखले जातात. कोरोनाच्या सर्वव्यापी साथीविरुद्ध मुकाबल्यासाठी सरकारने अंगीकारलेली रणनीती असो की, देशाची सध्याची अर्थव्यवस्था असो, चिदम्बरम सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. लसीची निर्यात, लसीकरणाची घटती संख्या आणि कोरोनाच्या संकटात सेंट्रल विस्टावरील निरर्थक खर्चासह विविध मुद्यांवर सरकारला सातत्याने आव्हान देत असतात. पी. चिदम्बरम यांनी ‘लोकमत’चे प्रतिनिधी शीलेश शर्मा यांना दिलेल्या परखड मुलाखतीचा हा सारांश...

मोदी सरकार सध्या हाताळत असलेल्या कोरोनास्थितीबाबत काय सांगाल? स्पष्ट सांगायचे म्हणजे मोदी सरकार सर्वार्थाने अपयशी ठरले आहे. लोकांना थाळीनाद करण्यास आणि दिवे उजळण्यास सांगून सरकारने विज्ञानाला कमी लेखत सुरक्षेच्या खोट्या भावनेला प्रेरित करणे. पहिली लाट ओसरली असताना पंतप्रधानांनी २८ जानेवारी २०२१ रोजी दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेच्या व्यासपीठावरून कोरोनावर विजय मिळविल्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी अभिमानाने असेही सांगितले की, भारताने १५० देशांना मदत केली. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने कोरोनाविरोधी लढ्याबद्दल पंतप्रधानांनी भरभरून प्रशंसा केली. वैज्ञानिक आणि साथरोगतज्ज्ञांनी वारंवार इशारे देऊन आणि अमेरिका व युरोपात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना मोदी सरकारने दुसऱ्या लाटेबाबत लोकांना सावध केले नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या अतिरिक्त सोयी-सुविधा नष्ट केल्या. सरकारने दोन भारतीय लस उत्पादकांची एकाधिकारशाही टिकविण्याचे धोरण अंगीकारले. अन्य कोणत्याही लसीला मंजुरी दिली नाही. अन्य उत्पादकांकडे मागणीही केली नाही. 

लसीचा तुटवडा आणि स्थिती हाताळण्याबाबत काय तोडगे आहेत?लसीचा पुरवठा वाढविण्यासाठी दोनच मार्ग आहेत. एक आयात करणे किंवा अन्य लस उत्पादकांना अनिवार्य परवाने देणे. स्पुतनिक वगळता अन्य कोणताही उत्पादक भारताला निर्यात करणार नाही. अन्य कोणत्याही लसीला मंजुरी देण्यात आलेली नाही. तसेच आजमितीपर्यंत अन्य कोणत्याही लस उत्पादकाकडे मागणी नोंदविण्यात आलेली नाही. ९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अन्य भारतीय उत्पादकांच्या अनिवार्य परवानाच्या मागणीला विरोध केला आहे. या संकटात काँग्रेस जनतेसाठी काय योगदान देऊ शकते?काँग्रेस विरोधी पक्ष आहे. आम्ही फक्त ठोस सूचना करू शकतो आणि तशा सूचनाही केल्या आहेत; परंतु एकही सूचना मान्य करण्यात आलेली नाही. काँग्रेसशासित राज्यांत मात्र आम्ही उत्तम काम करीत आहोत. 

कोरोनाची स्थिती हाताळण्यावरून सामान्यत: भारत सरकारची आणि पंतप्रधानांची प्रतिमा जागितक पातळीवर खालावली आहे का?कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लसीचा तुटवडा असल्याने नाकारणे, खरी संख्या दडविणे, बनवाबनवी करणे यावरून विदेशी प्रसार माध्यमांनी मोदी सरकारवर सडेतोड टीका केली आहे. या सर्व प्रकाराने मान खाली झुकली आहे. 

कोरोनाच्या सर्वव्यापी साथीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय ढोबळ उत्पादनात (जीडीपी) वृद्धी होण्याची आशा दिसत नाही. आणखी एक वर्ष नकारात्मक वृद्धीदर राहिल्यास त्यात मला तरी आश्चर्यकारक वाटत नाही. बेरोजगारी वाढेल. महिलाही बेरोजगार होतील. कंत्राटी, रोजंदारी आणि इतर कामगार आणि मजुरांना मोठा फटका बसेल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसP. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा