शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

Maharashtra Lockdown : "मुख्यमंत्र्यांचं FB live म्हणजे 'कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही',"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 8:04 AM

Atul Bhatkhalkar Criticize CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. तसेच या काळात सर्वसामान्यांसाठी मदतीचीही घोषणा केली.

मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी रात्री राज्यातील जनतेल संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. (coronavirus in Maharashtra) तसेच या काळात सर्वसामान्यांसाठी मदतीचीही घोषणा केली. (Maharashtra Lockdown) दरम्यान, ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (coronavirus: "CM's FB live means 'Confusion & confusion, solution is not known'," Atul Bhatkhalkar Criticize CM Uddhav Thackeray )

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, ‘’मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे 'कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही' या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते?’’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत अपुरी असल्याचे सांगत अतुल भातखळकर म्हणाले की, ‘’मध्यमवर्ग, दुकानदार, केशकर्तनालय, बारा बलुतेदार असे कित्येक लोक मदतीपासून वंचित राहणार. यांचा विचार कोणी करायचा. मुळात ज्यांना मदत दिली तीही अपुरी, इतरांना तर साफ वाऱ्यावर सोडलंय. त्यांना मदत का मिळाली नाही ? की मनात येईल ते बोलायचं आणि मनाला वाटेल ते करायचं सगळाच सावळा गोंधळ सुरू आहे, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, काल रात्री राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली. या काळात अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. कोरोनावरील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्यांना मदत या पोटी ५४७६ कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ऑक्सिजन आणण्यासाठी लष्कराची मदत मागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.गेले काही दिवस लॉकडाऊनची चर्चा असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना बुधवारी रात्री ८ पासून संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. गेले काही दिवस दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी होती आता पूर्णवेळ संचारबंदी लागू होणार आहे. हा जनताकर्फ्यू असेल, तो जनतेच्या सहकार्याशिवाय यशस्वी होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरPoliticsराजकारण