शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गरीब, गरजूंना केंद्राने थेट बँकेत पैसे पाठवावेत; काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 05:30 IST

यामुळे दशलक्षावधी लोकांच्या यातनांवर फुंकरच बसेल, असे नाही, तर आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेही ते चांगले असेल. कारण त्याचे अर्थव्यवस्थेवर अनेक अंगांनी परिणाम होतील, असेही अधिर रंजन चौधरी यांनी या पत्रात म्हटले.

नवी दिल्ली : सध्या कोरोना महामारीमुळे वेगवेगळ्या राज्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब, रोजंदारीवर काम करणारे आणि कमकुवत घटक देत असलेल्या अत्यंत कठीण परिस्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. महामारी आणि लॉकडाऊनमुळे या लोकांचे रोजगार गेले. उत्पन्न घटले. पर्यायाने त्यांच्यासमोर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे काँग्रेसचे लोकसभेतील नेते आणि लोक लेखा समितीचे अध्यक्ष अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी लिहिलेल्या पत्रात म्हटले.

वेगवेगळ्या राज्यांतील गरीब आणि गरजूंना सध्याच्या लॉकडाऊन दिवसांत थेट रोख पैसे पाठविण्याचा चौधरी यांच्या या पत्राचा विषय आहे. चौधरी त्यात म्हणतात की, “प्रतिकूल परिस्थितीमुळे या लोकांची परिस्थिती शोचनीय बनली असून, ते स्वत:ला पूर्णपणे निराधार आणि कोणतीही आशा शिल्लक राहिलेली नाही, असे समजत आहेत.  काँग्रेसच्या अध्यक्षांनी गरजूंना विनामूल्य धान्य आणि रोजगार नसलेल्या सर्वांना दरमहा सहा हजार रुपये द्यावेत, अशी सूचना केलीआहे.” सध्याच्या महामारीत गरीब आणि शोषित वर्गाची परिस्थिती विचारात घेता, सुरुवात म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊन असलेल्या सर्व राज्यांत (पश्चिम बंगालसह) सगळ्या पात्र लोकांना दरमहा सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठविण्याच्या काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेवर आपण गांभीर्याने विचार करावा, अशी मी आपणालाविनंती करीन. यामुळे दशलक्षावधी लोकांच्या यातनांवर फुंकरच बसेल, असे नाही, तर आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेही ते चांगले असेल. कारण त्याचे अर्थव्यवस्थेवर अनेक अंगांनी परिणाम होतील, असेही अधिर रंजन चौधरी यांनी या पत्रात म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या