शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Corona vaccine : कोरोना लसींची टंचाई, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे थेट मोदींना पत्र, केली २५ लाख डोसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 11:02 IST

coronavirus: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमधून कोरोनाच्या लसीची टंचाई निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (corona virus) कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमधून कोरोनाच्या लसीची टंचाई निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. (Corona vaccine )आंध्र प्रदेशमध्येही कोरोनाच्या लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ( Shortage of corona vaccine, Andra Pradesh CM YS Jaganmohan Reddy writes letter to Modi, demands 25 lakh doses)आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयाला एक पत्र लिहिले असून, या पत्रामधून जगनमोहन रेड्डी यांनी ११ ते १४ एप्रिलदरम्यान होणाऱ्या लस उत्सवासाठी कोरोनावरील लसींचे २५ लाख डोस उपलब्ध करून देण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना देण्याची विनंती केली आहे. या पत्रात जगनमोहन रेड्डी लिहितात की, सध्या आंध्र प्रदेशमध्ये कोरोनावरील लसीचे केवळ २ लाख डोस उपलब्ध आहेत. तर अजून २ लाख डोस शुक्रवारी मिळतील. त्यामुळे ११ एप्रिलपासून होणाऱ्या लस उत्सवासाठी आंध्र प्रदेशला २५ लाख डोसची तात्काळ आवश्यकता आहे.  कोरोनाचे व्यवस्थापन आणि लसीकरणाबाबत काल झालेल्या व्हिडिओ कॉन्फ्रन्सदरम्यान झालेल्या चर्चेबाबत काही महत्त्वपूर्ण मुद्दे मी उपस्थित करू इच्छितो. आंध्र प्रदेश तुम्ही दिलेल्या टेस्ट, ट्रॅक आणि ट्रेसच या त्रिसुत्रीचे दृढतेने पालन करत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तुम्ही केलेले मार्गदर्शन आणि नेतृत्वाचे संपूर्ण जग कौतुक करत आहे. मी आंध्र प्रदेशमधील कोरोना रोखण्यासाठीच्या व्यवस्थेबाबत तुमचे आभार मानतो, असेही जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

 यावेळी लस उत्सव हे अत्यंत आवश्यक पाऊल असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले. ११ ते १४ एप्रिलदरम्यान लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन तुम्ही केले आहे. लस घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठीचे हे आवश्यक पाऊल आहे. गावागावातील कुठलीही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही व्यवस्था करणार आहोत, असे आश्वासनही जगनमोहन रेड्डी यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी