शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine: प्रियांका गांधींचा  लसीवरून केंद्र सरकारवर 'हल्लाबोल' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:09 IST

Priyanka Gandhi News: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारीही मोर्चा सांभाळत केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली - सर्व प्रकारे प्रयत्न करूनही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला लागलेला डाग मिटताना दिसत नाही. राज्यातील कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, लसीचा तुटवडा आणि कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचे मृत्यू होत असल्यावरून सोशल मीडियावर लोक राज्य सरकारवर हल्ले चढवीत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारीही मोर्चा सांभाळत केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला.राज्यभरातून आलेल्या तक्रारीनुसार काही जिल्ह्यात एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीचे दोन डोस दिले जात आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये अशा २० घटना समोर आल्या आहेत. त्यांना पहिला डोस कोव्हॅक्सिनचा आणि दुसरा डोस कोविशिल्डचा देण्यात आला. यावर कहर म्हणजे मेरठनजीकच्या शामलीत एका परिचारिकेने काही महिलांना एकाचवेळी दोन्ही डोस दिले.असाच प्रकार कानपूरमध्येही घडला असून, तेथे एकाला कोविड लसीऐवजी ॲन्टीरेबिजचे इंजेक्शन देण्यात आले.या सर्व मुद्यांवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारला घेरत, याला जबाबदार कोण? असा सवाल केला आहे. लस उत्पादनात सर्वात अग्रणी असलेला भारत मागे कसा राहिला, याला जबाबदार कोण? केंद्र सरकार मागच्या वर्षापासूनच लसीकरण मोहिमेच्या तयारीत होते. राज्यातील कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, लसीचा तुटवडा आणि कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचे मृत्यू होत आहेत. जानेवारी २०२१ मध्ये फक्त एक कोटी साठ लाख लसीची मागणी का नोंदण्यात आली. मोठ्या प्रमाणावर विदेशात लस का निर्यात करण्यात आली? या सर्व मुद्यांवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारला घेरत, याला जबाबदार कोण? असा सवाल केला आहे. अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांनी सरकारकडून उत्तर मागितले आहे. तसेच त्यांनी आपले प्रश्न सोशल मीडियावरही पोस्ट करून लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPriyanka Gandhiप्रियंका गांधीCentral Governmentकेंद्र सरकार