शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Corona vaccine: खासगी रुग्णालयात कोरोनावरील मिळते तर महापालिका का उपलब्ध करू शकत नाही? प्रवीण दरेकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 20:01 IST

Corona vaccination in KDMC: गेल्या अनेक दिवसांपासून या महापालिका हद्दीत कोविड लसीकरण प्रक्रिया बंद पडली आहे, महापालिका प्रशासन नेमकं करतेय काय?

डोंबिवली - गेल्या अनेक दिवसांपासून या महापालिका हद्दीत कोविड लसीकरण प्रक्रिया बंद पडली आहे, महापालिका प्रशासन नेमकं करतेय काय? खासगी रुग्णालयात कोविड लस मिळते आहे तशी जी असेल ती टेंडर प्रकिर्या पूर्ण करून कोविड लस उपलब्ध करावी आणि सामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. रविवारी भाजपतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ( If corona vaccine is available in a private hospital, why can't the municipal corporation provide it? Question by Praveen Darekar)

महापालिका स्तरावरील मूलभूत समस्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. घनकचऱ्यावरील उपकर संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी कोविड काळात येथील नागरिकांना आर्थिक संकटात टाकत असल्याबद्दल नाराजी व्यक्त।केली. तसेच डोंबिवली शहर हे विज विषयात ग्रेड ए मध्ये येत असले तरीही येथील नागरिकांना भरमसाठ बिलाना आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, हे योग्य नाही. येथील नागरिकांसह राज्यातील त्रस्त ग्राहकांची त्यातून सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी दोन दिवसात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ऊर्जामंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. शहरातील रस्त्यांची समस्या देखील राज्य शासनाने सोडवावी, युतीत असताना त्यावर तोडगा काढला होता, तो तातडीने पूर्ण करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी दरेकर। यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केली.

कोविड लस घेतलेल्याना रेल्वे प्रवास हवाच ज्या नागरिकांनी कोविडच्या दोन लस घेतल्या आहेत त्यांना रेल्वे प्रवास हवा, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील कर्जत, कसारा मार्गावरील प्रवाशांना ती मुभा तातडीन देण्यात यावी. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने भेटणार असल्याचे दरेकर म्हणाले.  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा केंद्रात विचार केला जाईल असे स्पष्ट विधान।केले आहे. राज्याने पाऊल उचलावे असे आवाहन दरेकर यांनी आघाडी सरकारला केले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाpravin darekarप्रवीण दरेकर