शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

महाआघाडीत वादाची ठिणगी, राहुल गांधींवरील टीकेवरून काँग्रेस-आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोप

By बाळकृष्ण परब | Updated: November 16, 2020 11:39 IST

Bihar Assembly Election 2020 : आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

ठळक मुद्देतेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावाशिवानंद तिवारी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेतही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाने हुलकावणी दिल्यानंतर महाआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. तिवारी यांच्या टीकेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आरजेडीला आघाडीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला आहे.शिवानंद तिवारी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे.बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या मुद्द्यावरून आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर अनेक आरोप केले होते. बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असा आरोपही तिवारी यांनी केला.  महाआघाडीसाठी काँग्रेस ही  बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती, असेही शिवानंद तिवारी म्हणाले होते.दरम्यान, शिवानंद तिवारी यांच्या टीकेनंतर भाजपाचे नेते गिरिराज सिंह यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. बिहारमधील महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी सांगितले की राहुल गांधी नॉन सिरियस पर्यटक नेते आहेत. शिवानंद तिवारी राहुल गांधी यांना ओबामांपेक्षा अधिक ओळखू लागले आहेत. मग काँग्रेस अजूनही गप्प का? असा चिमटा त्यांनी काढला होता.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल