शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून होतेय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, फोटो शेअर करून भाजपाचा पवार कुटुंबीयांवर निशाणा

By बाळकृष्ण परब | Updated: January 24, 2021 15:37 IST

Baramati Agro News : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवरून आंदोलक शेतकऱ्यांबरोबरच देशातील प्रमुख विरोधी पक्ष कृषी कायद्यांवरून भाजपावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, आता भाजपानेही या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनामध्ये करार पद्धतीने शेती हा कळीचा मुद्दा ठरलेला आहेत्या माध्यमातून देशातील शेती ही उद्योगपतींच्या घशात घालण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा दावा केला जात आहेत्याला प्रत्युत्तर देताना अतुल भातखळकर यांनी बारामती अ‍ॅग्रोची ही जाहिरात शेअर केली आहे

मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चांमधून या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने कृषी कायद्यांबाबतचा तिढा कायम आहे. आंदोलक शेतकऱ्यांबरोबरच देशातील प्रमुख विरोधी पक्ष कृषी कायद्यांवरून भाजपावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, आता भाजपानेही या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी बारामती अ‍ॅग्रोची एक जाहिरात ट्विटरवर शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे.शेतकरी आंदोलनामध्ये करार पद्धतीने शेती हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्या माध्यमातून देशातील शेती ही उद्योगपतींच्या घशात घालण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा दावा केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर देताना अतुल भातखळकर यांनी बारामती अ‍ॅग्रोची ही जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीमध्ये करार शेतीचे फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये वर्षभर हमीभावाने खरेदी, क्रेडिटवर बियाणे, रोपांचा पुरवठा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे काही फायदे सांगण्यात आले आहेत.

दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या ट्रॅक्टर मोर्चात लाखो शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढत कूच केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकर