शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसच ठरविणार - भाई जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 05:44 IST

Mumbai News : एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले. 

मुंबई : काँग्रेस मोठा परिवार आहे. त्यामुळे भांड्याला भांड लागणे स्वाभाविक होते. पण, मागच्या काळात अंतर्गत मतभेद आता बाजूला सारत सर्वजण एकत्र येत आहोत. एखाद्या मतदारसंघात अजून काही अडचणी असल्या तरी त्यावर आमच्याकडे तोडगा आहे. एकजुटीने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. एकतर आमचा महापौर बसेल किंवा आमच्या मर्जीचा महापौरच महापालिकेच्या खुर्चीत बसेल. त्याशिवाय दुसरे चित्र नसेल, असे जगताप यावेळी म्हणाले. विभागीय काँग्रेसमधील नेतृत्व बदलानंतर अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या संपर्क अभियानाचा पहिला टप्पा रविवारी पार पडला. रविवारी दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यांनी सर्व सहा लोकसभा मतदारसंघातील मेळावे पार पडले. विशेष, म्हणजे अंतर्गत मतभेद बाजूला सारत गटांच्या नेत्यांनी आपापल्या भागातील मेळाव्यांना हजेरी लावली. रविवारी, सकाळी दक्षिण मुंबईतील कार्यक्रमास जगताप आणि सप्रा यांच्यासह माजी मंत्री मिलिंद देवरा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड, आमदार अमीन पटेल आदी नेते उपस्थित होते. तर, सायंकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमास संजय निरूपम, सुरेश शेट्टी आदी नेत्यांनी उपस्थिती लावली.   आगामी काळात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही जगताप यांनी दिला. येत्या काळात स्थानिक समित्यांवरील नियुक्त्या करताना मुंबई काँग्रेसमध्ये चर्चा केल्याशिवाय निर्णय होणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.  मुंबईत काँग्रेस आमदारांची संख्या दोन आकडी झाली की राज्यात आणि सहा खासदार निवडून आले तेंव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येते. ही सत्ता पुन्हा आणायची असेल तर महापालिकेची लढाईची तयारी आतापासुन सुरू करावी लागेल, असे जगताप म्हणाले. 

पदयात्रा सुरु करणार  आगामी काळात मुंबईतील सर्व जिल्ह्यांमधून पदयात्रांना सुरुवात करणार असल्याचे चरणसिंग सप्रा यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांमध्ये हात घातला पाहिजे. त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. काँग्रेसची विचारधारा लोकांना पटवून द्यायला हवी, असे सप्रा म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगतापMumbaiमुंबई