शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

अहमदनगरमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी : काँग्रेसचे नगरसेवक विखेंच्या स्वागताला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 11:59 IST

लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अहमदनगरमधील काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

अहमदनगर : लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अहमदनगरमधील काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. डॉ. विखे काल अहमदनगरमध्ये दाखल होताच ही दुफळी दिसून आली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे काल दुपारी अहमदनगर शहरात दाखल झाले. त्यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची भेट घेतली. यावेळी राठोड यांच्या पत्नी शशिकला यांनी त्यांचे औक्षण केले.नगर शहरातील शिवसेनेचे सर्वच नगरसेवक उपस्थित होते. तसेच शहरातील काँग्रेसच्या माजी पदाधिका-यांनी व नगरसेवकांनी डॉ.विखे यांचे जल्लोषात स्वागत केले. स्वागतावेळ काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, धनंजय जाधव, मुद्दसर शेख यांच्यासह सचिन जाधव उपस्थित होते. बाळासाहेब पवार, निखिल वारे, धनंजय जाधव या तिघांच्याही पत्नी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. तर मुद्दसर शेख स्थायी समितीचे सभापती आहेत.तर दुसरीकडे विखे भाजपात गेल्याने आघाडीचा प्रचार करण्यासाठी काही निवडक काँग्रेस नेत्यांची बैठक काल झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. वामशी चल्लारेड्डी, काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश चल्लारेड्डी यांनी दिले.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक