शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ममतांचा सोनियांना फोन गेला; काँग्रेसने पश्चिम बंगालमधील प्रचार थांबविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 07:06 IST

मतांचे विभाजन टा‌ळण्यासाठी प्रयत्न; ममता बॅनर्जी यांची सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ पैकी ११२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचे ३ टप्पे अद्याप पार पडावयाचे आहेत. परंतु, नेमक्या याचवेळी काँग्रेसने येथील प्रचारातून पूर्णपणे अंग काढून घेतल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी रविवारी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतरच काँग्रेसने या राज्यातील प्रचार जवळज‌वळ थांबवल्याचे दिसत आहे. येथील मतदानाचे उर्वरित तीन टप्पे २२, २६ आणि २९ एप्रिल रोजी पार पडणार आहेत. या टप्प्यांतील मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या ४१ टक्के इतकी लक्षणीय आहे. काँग्रेससाठी हे टप्पे महत्त्वाचे आहेत कारण मालदा, मुर्शिदाबाद या परिसरात पक्ष अनेक जागांवर लढत आहे. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस-डावे पक्ष यांच्यात या मुस्लीम मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ भाजपला मिळू नये, असे ममता बॅनर्जी यांना वाटते. म्हणूनच त्यांनी भाजपचा पराभव आणि सेक्युलर विचारांच्या विजयासाठी काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती सोनिया गांधी यांना केल्याचे समजते. ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सोमवारी काँग्रेसचे पश्चिम बंगालचे प्रमुख अधिररंजन चौधरी खूप ताप भरल्याने गृह विलगीकरणात गेले आहेत. त्यांना ‘लोकमत’ला दूरध्वनीवर बुधवारी सांगितले की, आपण उर्वरित टप्प्यांमध्ये प्रचार करू शकणार नाही. 

अन्य नेते प्रचारासाठी जाणार नाहीतपश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र प्रसाद यांनाही सोमवारी वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यात प्रचारासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले व त्यांनीही पश्चिम बंगालमधील सर्व रॅली रद्द केल्या. प्रियांका गांधीही यांनीही राज्यात प्रचार न करता दिल्लीत राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाने राज्यात अन्य कोणत्या स्टार प्रचारक नेत्याला पाठवण्याचा निर्णय घेतलेला नाही. चौधरी यांनी याला दुजोरा दिला आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेस