शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण; तडस यांची उमेदवारी निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:47 IST

गेल्या साडेचार वर्षांच्या काळात जिल्हा परिषद, नगर पालिकांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपने मुसंडी मारली.

- अभिनय खोपडेवर्धा लोकसभा मतदार संघात गेल्या वेळी काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचा पराभव करून भाजपाचे रामदास तडस निवडून आले होते. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात जिल्हा परिषद, नगर पालिकांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपने मुसंडी मारली. या मतदारसंघात काँग्रेसचे तीन व भाजपचे तीन आमदार आहेत. मात्र काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी असून, दस्तुरखुद्द राहुल गांधी यांच्या सभेनंतरही पक्षातील गटबाजी थांबलेली नाही. काँग्रेसकडून चारुलता खजानसिंग टोकस, शैलेश अग्रवाल या दोघांनी उमेदवारी मागितली आहे. टोकस या माजी मंत्री दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत. सध्या त्या दिल्लीनजीकच्या गुडगाव येथे राहतात. गेल्या वेळी दत्ता मेघे यांच्यासारखे बलाढ्य नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होते. आता मेघे पिता-पुत्र भाजपवासी झाले आहेत. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस पुन्हा उमेदवार राहतील, अशी दाट शक्यता आहे. सागर मेघे यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.सिंदी येथील ड्रायपोर्ट, वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे व नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याने ग्रामीण भागात भाजपविषयी नाराजी आहे. काँग्रेस-भाजपशिवाय या मतदारसंघात मागील दीड वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हेही कामाला लागले आहेत. त्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेस-राकाँ आघाडीत हा मतदारसंघ स्वाभिमानला सोडण्याबाबत हालचाली सुरू आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या दिल्लीस्थित नेत्यांकडे उमेदवारीसाठी नवखे असलेले शैलेश अग्रवाल ठाण मांडून आहेत.हिंदीभाषिक मतदार या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे ते उमेदवारीसाठी दावेदारी करीत आहेत. यापूर्वी चारदा या मतदार संघातून हिंदीभाषिक खासदार निवडून गेले आहेत. याव्यतिरिक्त बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आदींचेही उमेदवार रिंगणार राहणार आहेत. मात्र, खरा सामना भाजप व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारातच होईल, हे निश्चित!वर्धा मतदारएकूण मतदार- 17,95,495पुरुष- 8,83,887महिला- 8,38,493सध्याची परिस्थितीजिल्ह्यातील आठ नगरपालिका-पंचायतीत १०४ सदस्य असून, भाजपचे ५८, कॉँग्रेसचे ३०, राष्टÑवादीचे ६, सेनेचे ४ व इतर ६ सदस्य आहेत. सर्वच पालिकांवर भाजपची सत्ता आहे.जिल्हा परिषदेवरही भाजपची एकहाती सत्ता असून, ५२ पैकी ३१ सदस्य भाजपचे आहेत. तर १३ कॉँग्रेस, दोन राकॉँ, सेना दोन व अन्य चार सदस्य आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अनेक गट आहेत. जिल्हा सहकारी बँक डबघाईस आल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजपने या बँकेला नवसंजीवनी देण्याचे काम केले. त्यामुळे बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण होणार आहे. हाही निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपकडे दत्ता मेघे यांची शक्ती वाढल्याने, या मतदार संघात काँग्रेससमोर तगडे आव्हान भाजपचे आहे.२०१४ मध्ये मिळालेली मतेरामदास तडस (भाजप)- 5,37,518सागर मेघे (काँग्रेस)- 2,15,783चेतन पेंदाम (बसप)- 90,866मो. अलीम पटेल (आप)- 15,719श्रीकृष्ण चंपत उबाळे (अपक्ष)- 6,394

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपा