शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात काँग्रेसला संधी; पण उमेदवार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 04:06 IST

धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता; परंतु मागील दोन निवडणुकांमध्ये धुळे लोकसभेवर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे.

- राजेंद्र शर्माधुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता; परंतु मागील दोन निवडणुकांमध्ये धुळे लोकसभेवर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी काँग्रेसला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याची संधी आहे.धुळयात झालेल्या काँग्रेसच्या जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीनंतर उमेदवारीसाठी इच्छुक माजी मंत्री रोहिदास पाटील, जि. प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, जिल्हा बॅँक संचालक हर्षवर्धन दहिते व मालेगावचे महापौर शेख ही सात नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली. डॉ.तुषार शेवाळे वगळता अन्य इच्छुकांनी रोहिदास पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्यास आपला पाठिंबा असल्याचे बैठकीत सांगितले. त्यामुळे पाटील यांच्या दावेदारीला पाठबळ मिळाले आहे.दुसरे इच्छुक उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांची पक्षाने नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारीच टाकून पक्षश्रेष्ठीने डॉ. शेवाळेसह त्यांच्या समर्थकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य पार्लमेंटरी बोर्ड उमेदवार निश्चित करण्यापूर्वीच रोहिदास पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसमध्ये असलेला आमदार अमरिशभाई पटेल यांचा ‘अँकर गट’ सुरुवातीपासूनच पाटील यांच्या ‘जवाहर गटा’सोबत दिसत आहे. याशिवाय, भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विद्यमान खासदार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर केल्याने ही बाब काँग्रेसच्या पथ्यावर पडणारी आहे.भाजपाकडून डॉ. सुभाष भामरे यांचे नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येते. परंतु पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात डॉ.भामरे हे ‘डेंझर झोन’ मध्ये असल्याची चर्चा आहे. डॉ. भामरे यांनी याचे खंडण केले असले तरी, हा मुद्दा विरोधकांच्या हाती लागला आहे. डॉ. भामरे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनी मंत्री असतांना मतदारसंघात केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमीपूजन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झाले तर त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल. पण आमदार अनिल गोटे यांचा विरोध, जानेवारीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मेळाव्यात मालेगाव परिसरातील पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती या बाबी भामरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणाºया आहेत. शिवसेनेने उमेदवार दिला तर मते विभाजनाचा फटका भाजपाला बसू शकतो. खरी लढत भाजपा-काँग्रेसमध्येच होणार यात शंका नाही.सध्याची परिस्थितीगेल्यावेळेस युती होती. यंदा युती झाली नाहीतर शिवसेनेतर्फे पालकमंत्री दादा भुसे (मालेगाव) यांच्यासह माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.अन्य पक्षसुद्धा निवडणुकीत उमेदवार देणार का, हे सर्व निवडणुकीआधी स्थापन होणाºया आघाड्या आणि युतीच्या निर्णयावरच ठरेल. गेल्यावेळेस १९ उमेदवार रिंगणात होते.या मतदारसंघातील प्रस्तावित मनमाड - धुळे-इंदूर रेल्वेमार्ग हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या पाच वर्षात यावर बरीच चर्चा झाली आहे.लोकसभा निवडणुकीआधी या रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन होईल, असे सांगण्यात येत आहे. तसे झाले नाहीतर यंदा हा मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरणार आहे.धुळे लोकसभा मतदारएकूण मतदार- 15,75,225पुरुष- 8,08,302महिला- 7,66,923२०१४ मध्ये मिळालेली मतेडॉ. सुभाष भामरे (भाजप)- 5,29,450अमरीशभाई पटेल (काँग्रेस)- 3,98,727योेगेश ईशी (बसपा)- 9,897अन्सारी निहाल अहमद (आम पार्टी)- 9,339रमेश मोरे (अपक्ष)- 8,057

टॅग्स :Dhuleधुळेcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा