शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

राज्यसभेतील विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 23:23 IST

गुलाम नबी आझाद यांची या आठवड्यात निवृत्ती, मल्लिकार्जुन खरगे आघाडीवर

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद या आठवड्यात निवृत्त होत असल्यामुळे या जागेसाठी काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला आहे. गेल्या सहा वर्षांपासून आझाद यांच्याकडे ही जबाबदारी होती. तथापि, गेल्या वर्षी पक्ष श्रेष्ठींनी त्यांना राज्यसभेत पुन्हा संधी नाकारली. संधी का नाकारली याची कारणे अज्ञात आहेत. आझाद यांच्या जागेसाठी राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे आणि दिग्विजय सिंह आदी नेते उत्सुक आहेत. योगायाेगाने काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी संघटनात्मक निवडणुकाही घ्यायच्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी कोणाकडे देतात हे महत्त्वाचे. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी सुरक्षित खेळी खेळतील आणि नेतृत्वाची जबाबदारी खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे देऊ शकतील. खरगे २०१९ मध्ये पराभूत होईपर्यंत लोकसभेत पाच वर्षे पक्षाचे नेते होते. गेल्या वर्षी पक्ष नेतृत्वाविरोधात ज्या २३ नेत्यांनी पत्र लिहिले होते त्यात समाविष्ट असलेले आनंद शर्मा यांना अंधूकशीच संधी आहे. तथापि, नंतर शर्मा यांनी नेतृत्वाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधी यांची तेवढी मर्जी नाही. लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी समन्वयाने राज्यसभेतील नेते काम करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर राहुल गांधी नाराज आहेत. गेल्या आठवड्यात लोकसभा तहकूब करण्यास विरोधकांनी भाग पाडले असताना राज्यसभेचे कामकाज सामान्यरीत्या सुरू होते.चिदंबरम यांनाही हवी आहे आझाद यांची जागा पी. चिदंबरम यांनाही आझाद यांची जागा हवी आहे. चिदंबरम हे त्या नेत्यांत खूप सक्षम आणि अनुभवी आहेत, असे पक्षातील अनेकजण म्हणतात. विरोधी पक्षनेत्याचे पद हे कॅबिनेट दर्जाचे आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस