शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नवज्योत सिंग सिद्धू होणार पंजाबचे उपमुख्यमंत्री?; निवडणुकीआधी काँग्रेसची जोरदार तयारी, मिळणार मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 13:06 IST

Navjot Singh Sidhu And Punjab assembly election 2022 : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते सिद्धूंवर पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 होणाऱ्या निवडणुकांपूर्वी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

नवी दिल्ली - पंजाबमध्ये (Punjab) पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची (Punjab assembly election 2022) काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) हे बुधवारी दुपारी माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू  (Navjot Singh Sidhu) यांची भोजनाच्या निमित्ताने भेट घेण्याची शक्यता आहे. माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते सिद्धूंवर पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 होणाऱ्या निवडणुकांपूर्वी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. सिद्धू यांना काँग्रेस पंजाबचे उपमुख्यमंत्री (Deputy CM) करण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 

नवज्योत सिंग सिद्धू  आणि अमरिंदर सिंग यांच्यामध्ये दुपारच्या भोजनानिमित्त होणारी ही दुसरी भेट आहे. याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या प्रकारची पहिली भेट झाली होती. दोन्ही गटांमधील नाराजी दूर करण्याचा मार्ग म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. सिद्धू यांची या पद्धतीने भेट घेणार असल्याचं सिंग यांनी तेव्हा सांगितलं होतं. सिद्धू यांनी 2019 साली स्थानिक पालिका मंत्रालय काढून घेतल्याच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व सिद्धू यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मुख्यमंत्र्यासोबत होणारी भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

काँग्रेस नेते आणि पंजाब प्रभारी हरिश रावत यांनी सिद्धू यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. रावत यांनी 10 मार्च रोजी सिद्धू यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही भेट सकारात्मक झाल्याचा दावा सिद्धू यांनी केला होता. तसेच काँग्रेस नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याशी सिद्धू यांचे चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक स्टार प्रचारक म्हणून देखील त्यांचा निवडणुकीत उपयोग होऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, नाराज सिद्धू यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. 

"श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?"

गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या अनोख्या शैलीत एक खास ट्विट केलं होतं. शेतकरी आंदोलन आणि एकंदर परिस्थितीवर शेरोशायरीच्या अंदाजात नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाष्य केलं. "श्रीमंताच्या घरातील कावळाही मोर दिसतो" असं ट्विटमध्ये म्हटलं असून त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा रंगली होती. "श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?" असा थेट सवाल सिद्धू यांनी केला होता. 

"जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो"

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांचा आंदोलनाला हिंसक वळण लागलं. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. "जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो. आजपर्यंत कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन जिंकलेलं नाही हेच इतिहासाने आपल्याला सांगितलं आहे" असं सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाबElectionनिवडणूकcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधी