शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:38 IST

Bhiwandi Lok Sabha constituency Politics: भाजपकडे असलेली भिवंडी लोकसभा खेचण्यासाठी सुरेश म्हात्रे यांना आपल्या गोटात घेण्यासाठी काँग्रेसनेत्यांच्या हालचाली देखील वाढल्या असून सुरेश म्हात्रे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

भिवंडी - शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळया मामा यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पक्ष सदस्य पदाबरोबरच आपला ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे दिला आहे. बाळ्या मामा यांच्या राजीनाम्यानंतर ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दरम्यान आपल्या  पक्ष प्रवेशा बाबत सुरेश म्हात्रे यांनी अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर केलेली नसली तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळ्या मामा यांनी आपला राजीनामा दिला असल्याने त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. 

 भाजपचे खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून बाळ्या मामा जिल्ह्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहेत. शिवसेनेत असतांनाही बाळ्या मामा यांनी २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते. त्यामुळे सेना भाजप युतीच्या विरोधात काम केल्यामुळे सेना पक्षश्रेष्ठींनी बाळ्या मामा यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती. त्यावेळी कारवाई झाली तरी बेहत्तर मात्र कपिल पाटील यांना निवडणुकीत मदत करणार नाही अशी भूमिका सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली होती. मात्र २०१९ साली काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश टावरे यांना बाळ्या मामा यांच्या राजकीय मदतीचा फायदा घेता आला नाही आणि त्यामुळे काँग्रेसला भिवंडी लोकसभा मतदार संघावर पाणी फेरावे लागले. 

 भिवंडी लोकसभा मतदार संघात मुस्लिम मतदार जास्त असून या मतदारांचा काँग्रेसपक्षाच्या उमेदवाराकडे मतदान करण्याचा कल जास्त असतो, त्यातच भिवंडी ग्रामीण भागात बाळ्या मामा यांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून भिवंडी लोकसभेत असलेल्या भिवंडी , शहापूर , मुरबाड , कल्याण या मतदार संघात म्हात्रे यांचा आजही चांगला दबदबा व दरारा आहे. शहरातील मुस्लिम मतदार व ग्रामीण भागात असलेला बाळ्या मामा यांचा चाहता वर्ग या सर्वांचाच फायदा सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेस पक्षाला होणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेते देखील या बाबत सकारात्मक असून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना काँग्रेस पक्षात घेण्यास उत्सुक झाले असून काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते सध्या बाळ्या मामा यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकंदरीत सुरेश म्हात्रे यांच्या काँग्रेसपक्ष प्रवेशाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत असून भाजपकडे असलेली भिवंडी लोकसभा खेचण्यासाठी सुरेश म्हात्रे यांना आपल्या गोटात घेण्यासाठी काँग्रेसनेत्यांच्या हालचाली देखील वाढल्या असून सुरेश म्हात्रे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. 

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीPoliticsराजकारणcongressकाँग्रेस