शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंच नसलेली शाळा ते भारताचे सरन्यायाधीश; सूर्य कांत यांचा प्रेरणादायी प्रवास; राष्ट्रपतींनी दिली 'सर्वोच्च' पदाची शपथ
2
वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार
3
'आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा, घरी लग्न आहे... चार दिवसांनी घेऊन जाऊ', मुलाचं वृद्धाश्रमाला उत्तर; बापाला अश्रू अनावर!
4
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड
5
तेजस फायटर जेट क्रॅशचा मोठा फटका! HAL च्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची मोठी घसरण; अजून पडणार?
6
'आम्ही काव्याकडे जातोय...'; लेकीच्या विरहाने ग्रासलं, संपूर्ण कुटुंबानं एकत्र आयुष्य संपवलं! वाचून काळजाचं पाणी होईल! 
7
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
8
नांतवाला भेटायला गेला, कॅनडातून भारतीयाला हाकलवून दिले; मुलींचा छळ, जबरदस्तीने 'सेल्फी' घेणं पडलं महागात
9
तुमच्या घराचं स्वप्न साकार होणार! PM आवास योजना २०२५ ची नवीन यादी जाहीर; असे तपासा आपले नाव!
10
दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 
11
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
12
बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?
13
वाहतूककोंडीमुळे घोडबंदर रस्ता दुरुस्ती रखडली; अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा बार ठरला 'फुसका'
14
'शोले'तील 'गब्बर'चा मुलगा, राणी मुखर्जीचा पहिला हिरो; आता कुठे गायब आहे अभिनेता?
15
IND vs SA : गुवाहाटीत द. आफ्रिकेचं “समदं ओकेमध्ये हाय…”; भारताचे 'शेर' पहिल्या डावात सपशेल ढेर!
16
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
17
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
18
एक ट्रीप, २ देश...कमी खर्चात कसं करायचा 'डबल प्रवास'?; जाणून घ्या बजेटमधला परफेक्ट फॉर्म्युला
19
"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
20
"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी वाढत गेली, तसा जीडीपी घसरत गेला"; काँग्रेस नेत्याचा 'ग्राफिकल' टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 11:54 IST

Shashi tharoor on Pm Narendra Modi : देशाच्या जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीदरम्यान २४ टक्के, तर दुसऱ्या तिमाहीदरम्यान ७.५ टक्क्यांची घसरण झाली. 

ठळक मुद्देदेशाच्या जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीदरम्यान २४ टक्के झाली होती घसरण दुसऱ्या तिमाहीदरम्यान ७.५ टक्क्यांची घसरण झाली. 

देशाच्या जीडीपीवरुन पुन्हा एकदा काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी २०१७ पासून २०१९-२० या वर्षांतील जीडीपीच्या आकडेवारीची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीशी केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मोदींच्या दाढीची साईजही वेगवेगळी आहे.शशी थरूर यांनी एका ग्राफिकसोबत त्यांचे हे फोटो शेअर केले आहेत. २०१७-१८ च्या चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी ८.१ टक्के होता. जो २०१९-२० च्या दुसऱ्या तिमाहीत ४.५ टक्के राहिला. यालाच ग्राफिक्स इलस्ट्रेशनचा अर्थ म्हणतात असं कॅप्शनही त्यांनी याला दिलं आहे. पुढील काळात देशाच्या जीडीपीमध्ये सकारात्मक वाढ होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे जीडीपीमध्ये घसरण झाली होती.  २०२०-२१ दरम्यान जीडीपीमध्ये ६.८ टक्क्यांची घसरण दिसून येऊ शकते असं डीबीएस बँकेनं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे. २०२० च्या अखेरच्या तिमाहीत जीडीपीचा दर सकारात्मक होऊ शकतो असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. देशात कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानं आणि लोकांनी पुन्हा खर्च करण्यास सुरू केलं आहे हे दोन्ही मुद्दे डिसेंबर २०२० च्या तिमाहीसाठी चांगले ठरतील, असं मत डीबीएस समूहाच्या अर्थविषयक तज्ज्ञ राधिका राव यांनी व्यक्त केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरEconomyअर्थव्यवस्था