शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"महिन्यातून एकदा निरर्थक बोलणं नाही तर...", मोदींच्या 'मन की बात'वरून राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 14:04 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर 'मन की बात' कार्यक्रमावरून ट्विट करत निशाणा साधला आहे.

ठळक मुद्दे'कोरोना साथीचे निर्मूलन करायचे असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. लॉकडाऊन, मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यामुळे कोरोना साथ संपणार नाही'

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे संकट ओढावले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच, लसीकरण मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी दररोज आढळून येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. तसेच, रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आदींचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, लस तुटवड्यामुळे लसीकरण मोहीमेस अनेक ठिकाणी स्थगिती द्यावी लागत आहे.(Congress leader Rahul Gandhi criticizes PM Narendra Modi on 'Mann Ki Baat')

याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. मात्र, तत्पूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर 'मन की बात' कार्यक्रमावरून ट्विट करत निशाणा साधला आहे. "कोरोनाशी लढण्यासाठी पाहिजे – योग्य हेतू, धोरण, निश्चय. महिन्यातून एकदा निरर्थक बोलणं नाही", अशा शब्दांमध्ये ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान, कोरोना साथीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. लसीकरण मोहीम मोदी सरकारने योग्य पद्धतीने राबविली नाही तर कोरोना साथीच्या लाटांवर लाटा थडकत राहतील व त्या अधिक भयानक असतील असा इशारा राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिला होता. 

गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी देश पूर्ण ताकतीने लढतोय - नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी भारतावर कोरोनाचे भयानक संकट आलेले असताना देशातील नागरिकांनी धैर्य दाखवले, गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारी विरोधात संपूर्ण देश पूर्ण ताकतीने लढतोय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या महामारीमुळे आलेल्या अनेक संकटांना देशाने यशस्वीपणे तोंड दिले आहे. या दरम्यान अम्फान, निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते, यास वादळ तसेच अनेक ठिकाणी भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यांचाही देशाने चिकाटीने मुकाबला केला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

(मुलीने आपल्या आई-वडिलांना काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या अन्...)

लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे - राहुल गांधीकोरोना साथीचे निर्मूलन करायचे असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. लॉकडाऊन, मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यामुळे कोरोना साथ संपणार नाही. तिचे निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. कोरोना लस देण्यात आपण जितका उशीर करू तितके या विषाणूची नवनवीन उत्परिवर्तने व प्रकार अस्तित्वात येऊन माणसांवर हल्ला करतील. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याचीही भीती आहे. कोरोना विषाणू आपले रूप सतत पालटत असतो, असे दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत राहुल गांधी म्हणाले होते. तसेच, कोरोना साथ भीषण रूप धारण करू शकते, असा इशारा मी पहिल्यापासून देत होतो, पण त्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले. देशातील लोकसंख्येपैकी फक्त तीन टक्के लोकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याMan ki Baatमन की बात