शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये इनकमिंग जोरात! प्रवीण छेडांची घरवापसी; भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 14:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेस नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. छेडा यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनीही कमळ हाती घेतलं. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. यावेळी भाजपाचे खासदार संजय काकडे उपस्थित होते. काकडे यांची नाराजी दूर झाल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रवीण छेडा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपानं काल संध्याकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र यामध्ये ईशान्य मुंबईचा समावेश नाही. भाजपाचे किरीट सोमय्या या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. मात्र त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे भाजपानं अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. या मतदारसंघातून सोमय्यांऐवजी छेडा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. आधी भाजपामध्ये असलेल्या छेडा यांनी प्रकाश मेहतांसोबत मतभेद झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवीण छेडांसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला. पवार यांनी 2014 मध्ये दिंडोरीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपाच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादीनं त्यांना तिकीट नाकारत धनराज महालेंना संधी दिली. दोनच दिवसांपूर्वी माढ्यातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याआधी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाKirit Somaiyaकिरीट सोमय्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस