शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही - नवज्योत सिंग सिद्धू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 15:45 IST

navjot singh sidhu : कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवे राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना संकटात पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंजाब कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस हाय कमांडने सर्व आमदार, मंत्री आणि राज्यातील नेत्यांना दिल्लीला बोलवले आहे. या दरम्यान मंगळवारी कॉंग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिल्लीत हायकमांडकडून गठीत करण्यात आलेल्या तीन सदस्यीय पॅनलसोबत चर्चा केली. (congress leader navjot singh sidhu in delhi punjab congress rebel meet panel updates) 

नवज्योतसिंग सिद्धू यांनी या बैठकीनंतर सांगितले की, मी हायकमांडने बोलविल्यानंतर याठिकाणी आलो आहे, पंजाबमधील जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी आलो आहे. मी पंजाबचे सत्य आणि हक्काचा आवाज हायककमांडला सांगितला आहे'. याचबरोबर, माझी भूमिका अशी आहे की पंजाबमधील लोकांमध्ये लोकशाही ताकद आहे, त्यांना ती मिळायला हवी. सत्य काय आहे, ते मी संपूर्णपणे सांगून आलो आहे. सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही, आम्हाला पंजाबला जिंकायचे आहे. तसेच, प्रत्येक पंजाबविरोधी शक्तीचा पराभव होईल, असेही नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले.

दरम्यान, कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवे राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचे दिसत आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्या अगोदर पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कसह निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस हायकमांडकडून यामध्ये लक्ष घातल्या जात आहे. 

मंगळवारी पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदार आणि मंत्री काँग्रेसमधील तीन सदस्यीय पॅनलसमोर त्यांच्या समस्या मांडत आहेत. काँग्रेसच्या किमान २४-२५ आमदार ज्यात प्रदेशाध्यक्ष सुनील झाखडं, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंग रंधावा यांचा समावेश आहे. ते सर्व दिल्लीत दाखल झाले आहेत. निवडणुकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वादनवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पक्ष प्रभारी आशा सिंग यांच्यावर तिकीट कापल्याचा आरोप केला होता. कॅप्टन साहेब आणि आशा कुमारी यांनी मॅडम सिद्धू लोकसभेच्या उमेदावारीसाठी योग्य वाटत नाहीत. दसऱ्या दिवशी झालेल्या ट्रेन दुर्घटनेच्या आधारावर माझे तिकीट कापले गेले, असा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला होता. तर माझी बायको कधी खोटे बोलत नाही. ती नैतिकतेने मजबूत आहे, असे सांगत नवज्योत सिंग यांनी तिची पाठराखण केली होती. 

टॅग्स :PunjabपंजाबPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू