शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये उमलणार कमळ; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 8:54 PM

लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत असतानाच आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे.

गांधीनगरः लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत असतानाच आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून भाजपाला गुजरातमध्येही धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा असून, गेल्या वेळी भाजपानं सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. परंतु यंदा चित्र काहीसं बदललेलं पाहायला मिळणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही भाजपाला फटका बसणार आहे. भाजपाच्या 4 जागा घटणार आहेत. त्यामुळे यंदा भाजपाला 22 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. गेल्या वेळी म्हणजेच 2014च्या निवडणुकीत भाजपाला 59.1 टक्के मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 32.2 एवढी होती. परंतु यंदा भाजपाच्या मतांची टक्केवारी घटणार असून, त्याचा लाभ काँग्रेसला होणार आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 51.37, तर काँग्रेसला 39.5 टक्के मत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच याचा फटका बसून भाजपाच्या 4 जागा घटणार आहेत. 

तर दुसरीकडे गुजरातमध्ये सध्या 9.5 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचा इतिहास लक्षात घेतल्यास, 1962 मध्ये बनासकांठामधून जोहरा चावडा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 1977 मध्ये दोन मुस्लिम उमेदवार निवडून आले. अहमद पटेल (भरुच) आणि एहसान जाफरी (अहमदाबाद) अशा दोन उमेदवारांवर जनतेनं विश्वास दाखवला. एकाच निवडणुकीत दोन मुस्लिम खासदार निवडून देण्याची गुजरातची ही पहिली आणि शेवटची वेळ होती. गुजरात भाजपासाठी हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. या राज्यात भाजपानं कधीही मुस्लिम उमेदवार दिला नाही. काँग्रेसनं 2014 पर्यंत राज्यात 15 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले. यावेळी काँग्रेसनं फक्त भरुचमधून मुस्लिम उमेदवार दिला आहे. भरुच मतदारसंघात मुस्लिमांचं प्राबल्य आहे. या मतदारसंघात 15.64 लाख मतदार आहेत. यातील 22 टक्के मतदार मुस्लिम आहेत. तर अहमदाबाद पश्चिममध्ये 25 टक्के मुस्लिम मतदार आहेत. गांधीनगरमधील जुहापुरामध्येदेखील मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. यंदा गांधीनगरमधून भाजपाचे अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस