मेरठमधील सरधाना येथील केली या गावात रविवारी काँग्रेसकडून महापंचायत बोलावण्यात आली होती. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी या ठिकाणी जमलेल्यांना संबोधित केलं. "कृषी कायदे मागे घेण्यासाठी कितीही वर्षे लागली तरी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत उभी राहिल. यासाठी १०० दिवस लागले किंवा १०० वर्षे लागली तरी शेतकरी आणि काँग्रेस मागे हटणार नाही," असं त्या म्हणाल्या."माझ्यात जोपर्यंत ताकद आहे तोवर मी लढणार. यासाठी मग १०० दिवस असो किंवा १०० वर्ष. संसदेत शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला. आंदोलनजीवी, परजीवी असा उल्लेख करून त्यांचा अपमान करणअयात आला. दिल्लीतील सीमेप्रमाणेच प्रत्येक गावागावात आंदोलन करा. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा काँग्रेस तुमच्या पाठीशी उभी राहिल. सुख आणि दु:ख काहीही असो आम्ही तुमच्यासाठी कायम उभ असू. तुमची लढाई माझी आहे," असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.
Farmers Protest : "जोवर ताकद तोवर लढणार, १०० दिवस असो किंवा १००..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 18:46 IST
Farmers Protest : कितीही वर्षे लागली तरी काँग्रेस आणि शेतकरी मागे हटणार नाही, प्रियंका गांधींचा इशारा
Farmers Protest : जोवर ताकद तोवर लढणार, १०० दिवस असो किंवा १००...
ठळक मुद्देकितीही वर्षे लागली तरी काँग्रेस आणि शेतकरी मागे हटणार नाही, प्रियंका गांधींचा इशारा'हम दो हमारे दो'चं सरकार प्रियंका गांधी पुन्हा कडाडल्या