शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पाटील, राऊतांची सूचकं विधानं अन् ठाकरे-फडणवीसांची भेट; शिवसेना-भाजपचं नेमकं चाललंय काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 14:56 IST

कोकणात जनआशीर्वाद सुरू असताना, भाजप नेते शिवसेनेवर बरसत असताना मुंबईत वेगळ्याच घडामोडी

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेना, भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पक्ष कार्यालयांची तोडफोड झाली. यानंतर आता वेगळ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेनेबद्दलच्या युतीबद्दल सूचक विधान केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही सूर थोडा बदलला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड १० मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

कोकणात नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना, राणेंसोबत असलेले भाजप नेते शिवसेनेला थेट शिंगावर घेत असताना दुसरीकडे मुंबईत वेगळ्याच घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंनी आज सह्याद्री अतिथीगृहात ओबीसींच्या आरक्षण प्रश्नावर एक बैठक बोलावली होती. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर दरेकर तिथून निघाले आणि फडणवीस-ठाकरेंमध्ये १० मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली.

काय म्हणाले संजय राऊत?शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपवर तोफ डागली. मात्र त्यांचा संपूर्ण रोख इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांवर होता. त्यांचा उल्लेख राऊतांनी बाटगे असा केला. शिवसेना आणि भाजप राजकीयदृष्ट्या वेगळे झाले आहेत. मात्र दोन्ही पक्षांमधला हिंदुत्वाचा धागा कायम आहे. मात्र भाजपमधले बाटगे वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. त्यांच्याकडून बेताल वक्तव्यं सुरू आहेत. अशी विधानं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखी भाजपची जुनीजाणती मंडळी कधीही करणार नाहीत, अशा शब्दांत राऊतांनी भाजपमधल्या आयारामांचा समाचार घेतला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेना आणि भाजपच्या वाढत्या संघर्षाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर २०१४ मध्येदेखील अशीच परिस्थिती होती. युती तुटली होती. दोन्ही बाजूला अशीच कटुता होती. मात्र त्यानंतर भाजप-शिवसेनेचं सरकार राज्यात आलं. आता शिवसेना-भाजप आमनेसामने आल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीवाले हसून मजा बघत आहेत. आता मजा येईल म्हणून असं त्यांना वाटतंय. मात्र तसं होईल याची खात्री देता येत नाही, असं उत्तर पाटील यांनी दिलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणेSanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटील