शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीवरून खडाजंगी; मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 06:56 IST

राज्यात अघोषित आणीबाणी असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.

मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अघोषित आणीबाणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. राज्यात अघोषित आणीबाणी असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले. दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर भाजप नेत्यांनी बहिष्कार टाकला. राजकीय मेळावे, कार्यक्रम सुरू झाले असताना अधिवेशनाला विरोध, ही भूमिका अनाकलनीय आहे. मागच्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात वेळ वाया जाण्याची शक्यता फडणवीस यांनी बोलून दाखविली. ओबीसींच्या प्रश्नावरूनही ठाकरे आणि फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर भाजप रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला तर, ओबीसींच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रश्नच नाही. विरोधी पक्षांनी ओबीसींना उगाच चिथावणी देऊन सामाजिक सलोखा बिघडवू नये, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रश्नच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुंबई बँकेची चौकशी करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तुरुंगात टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत, या फडणवीस यांच्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले की कदाचित दरेकर यांना तुरुंगात टाकावे, असे फडणवीस यांना सुचवायचे असावे. फडणवीस यांना पक्षात कोण हवे, नको हे कळेनासे झाले आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.मुंबईत सर्वांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.महाविकास आघाडीतील पक्ष ठरवून राजकीय नाट्य करत आहेत. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक  विसंगत भूमिका वठविल्या जात आहेत. एक पक्ष बाजूने बोलतो, दुसरा विरोधात आणि तिसरा तटस्थ अशी विसंगत भूमिका रंगवली जात आहे. त्यातून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. कधी नव्हे ती आज राज्याची सामाजिक घडी विस्कटत आहे. राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षणाचा तिढा निर्माण झाला. या प्रश्नावर सरकारमध्ये एकवाक्यता नाही, गांभीर्य नाही.

देशात सध्या भयंकर स्थिती : ठाकरेमहाराष्ट्रात आणीबाणीची स्थिती असल्याचे फडणवीसांना वाटते, पण शेतकऱ्यांना अतिरेकी, पाकिस्तानी, चिनी म्हणणारे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर वागताहेत, त्यांच्या न्याय्य हक्कांबद्दल बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे, अशी जोरदार टीका ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचे फडणवीसांना वाटते, मग दिल्लीत जे चाललंय ते तर आणीबाणीपेक्षाही भयंकर आहे, असे सांगत ठाकरे यांनी कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीतील आंदोलकांसमोर जाऊन सांगावे, असे आव्हान विरोधकांना दिले.देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आज पडलेला दिसत होता. विधान परिषद निवडणूक निकालाचा हा परिणाम दिसतो, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. राज्यात अघोषित आणीबाणी- देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात खरे तर ठाकरे सरकारला चपराक बसली तरीही कुणीही सरकारविरोधात बोलले की, त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.  फडणवीस यांनी शेतकरी, कोरोना काळातील बळी व भ्रष्टाचार, महिलांवरील वाढते अत्याचार, मराठा आणि ओबीसी आरक्षण तसेच विकासकामांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली.  राजकीय आकसापोटी चांगल्या योजना बंद केल्या जात आहेत. समृद्धी महामार्गाला आधी विरोध केला. व आता त्याला बाळासाहेबांचे नाव दिले. हवे तर आमच्या सर्व प्रकल्पांना तुमची नावे द्या. पण, चांगल्या योजना चालू ठेवा, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस