शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करावेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 07:03 IST

मदरसे व तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तत्काळ थांबवून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणीसुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

मुंबई : हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी धर्मांध शिक्षण देणारे राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी भाजपचे नेते व कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील मदरसे वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, त्यातून कोणतेही आधुनिक शिक्षण न देता केवळ एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाते. राज्यातील करदात्यांच्या पैशावर चालणारे हे प्रकार अत्यंत चूक असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे व तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तत्काळ थांबवून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणीसुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिजवी यांनी तर मदरशांना आतंकवादी संघटनांकडूनसुद्धा पैसे पुरविले जात असल्याने, सर्व राज्यांनी मदरशांवर बंदी घालून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणाच्याही दबावाला बळी न पडता धाडसी निर्णय घ्यावा, अशी मागणीसुद्धा भातखळकर यांनी केली. काल आसाम सरकारने आसाममधील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. भातखळकर यांनी केलेल्या मागणीची अंमलबजावणी होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेHindutvaहिंदुत्व