शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 19:02 IST

Eknath Shinde Maharashtra Vidhan Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्या गेलेल्या आणि मंत्रि‍पदाच्या प्रतिक्षेत असलेल्या तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसने केले. तीन नेत्यांची मंत्रि‍पदाचा दर्जा असलेल्या मंडळांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

Eknath Shinde Shiv Sena News : विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील काही नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पावले उचलली आहेत. लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेल्या आणि मंत्रि‍पदाच्या प्रतिक्षेत असलेल्या नेत्यांना संयमाचे फळ शिंदेंनी दिले. माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी खासदार हेमंत पाटील आणि आमदार संजय शिरसाट यांची वेगवेगळ्या महामंडळाच्या अध्यक्ष पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदांना मंत्रि‍पदाचा दर्जा आहे. 

विधानसभा निवडणुकीआधी पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंकडून पावले उचलली जात आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापण्यात आलेल्या कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर घेत शिंदेंनी राजकीय पुनर्वसन केले. त्यानंतर आता अमरावती आणि हिंगोलीच्या माजी खासदारांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. 

आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील यांना मंत्रि‍पदाचा दर्जा

अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराव अडसूळ निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण, भाजपाने दावा करत नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अडसूळ नाराज झाले. अनेकदा त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली. 

आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोलीतून तिकीट कापण्यात आलेल्या हेमंत पाटील यांची हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे असलेल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला मंत्रि‍पदाचा दर्जा देण्यात आला आहे. 

मंत्रि‍पदाच्या प्रतिक्षेत असलेले शिरसाट सिडकोचे अध्यक्ष

शिवसेनेचे प्रवक्ते आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांची सिडको अर्थात शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला मंत्रि‍पदाचा दर्जा आहे. 

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांपैकी एक संजय शिरसाट होते. महायुती सरकार स्थापन झाले, त्यावेळी शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल, असे म्हटले जात होते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मंत्रि‍पदी वर्णी लागेल, असेही म्हटले गेले. अखेर शिंदेकडून त्यांचे सिडको अध्यक्षपदी पुनर्वसन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या तिन्ही नेत्यांच्या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Hemant Patilहेमंत पाटीलAnandrao Adsulआनंदराव अडसूळ