शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मातोश्रीवर मध्यरात्रीपर्यंत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा रंगली; युतीची रणनिती ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 07:00 IST

लोकसभा निवडणुकीची निश्चित करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत बैठक

- मनोहर कुंभेजकरमुंबई: युतीची रणनिती ठरवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज उशिरा मध्यरात्री पर्यंत मातोश्रीत चर्चा रंगली. गेल्या 17 फेब्रुवारीला वरळी येथे युतीची घोषणा करण्यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीत आले होते.युतीची घोषणा केल्यावर आज मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले ते  लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी. लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३, तर भाजपा २५ जागा लढवणार आहे. त्यामुळे यापुढे युतीच्या उमेदवारांचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत. येत्या १५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे  महाराष्ट्रात सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यांनंतर महाराष्ट्रातील युतीचा सर्वात मोठा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याची घोषणाही येत्या दोन दिवसांत होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी लोकमतला आज मध्यरात्री दिली. या बैठकीला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. या बैठकीत ठरलेल्या रणनितीप्रमाणे भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा येत्या शुक्रवारी दि १५ मार्च रोजी दुपारी अमरावतीला होणार असून दुसरा पदाधिकारी मेळावा १५ मार्चला रात्री नागपूरला होणार आहे. युतीचा तिसरा मेळावा येत्या रविवारी म्हणजेच १७ मार्चला दुपारी औरंगाबादला होणार असून याच दिवशी युतीचा चौथा मेळावा रात्री नाशिकला होणार आहे. युतीचा पाचवा मेळावा सोमवारी म्हणजेच १८ मार्चला दुपारी नवी मुंबईत होणार असून याच दिवशी युतीचा सहावा मेळावा रात्री पुण्यात होणार असल्याचे या बैठकीत ठरले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना