Chirag Paswan: “माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेतला, हा लढा मोठा आहे”: चिराग पासवान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:57 PM2021-06-16T15:57:14+5:302021-06-16T16:00:05+5:30

Chirag Paswan: चिराग पासवान यांनी परशुपति पारस यांच्याशी असलेल्या वादावर सविस्तर भाष्य करत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

chirag paswan says all of this had conspired when I was not well | Chirag Paswan: “माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेतला, हा लढा मोठा आहे”: चिराग पासवान

Chirag Paswan: “माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेतला, हा लढा मोठा आहे”: चिराग पासवान

Next
ठळक मुद्देचिरंजीव चिराग पासवान यांनी स्पष्ट केली भूमिकाकाका परशुपति पारस यांच्या भूमिकेवर केले भाष्यजनता दल युनायटेडकडून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न - चिराग पासवान

पाटणा: लोक जनशक्ती पक्षातील वाद शमताना दिसत नाही. याउलट आता पक्षांतर्गत धुसपूस वाढण्याची चिन्हे आहे. यामुळे बिहारमधीलराजकारण तापताना पाहायला मिळत आहे. यातच दिवंगत केंद्रीय नेते रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी परशुपति पारस यांच्याशी असलेल्या वादावर सविस्तर भाष्य करत स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेण्यात आला. हा लढा मोठा असून, कायदेशीर लढाईलाही तयार असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले आहे. (chirag paswan says all of this had conspired when I was not well)

कुटुंबातील गोष्टी बाहेर पडू नयेत. बंद दाराआड सर्व मुद्द्यांचा निपटारा व्हावा, असे वाटत होते. गेल्या काही दिवासांपासून माझी तब्येत बरी नव्हती. मी जास्त घराबाहेर पडू शकलो नाही. माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेत कट रचण्यात आल्याचा आरोप चिराग पासवान यांनी केला आहे. काकांनी इच्छा व्यक्त केली असती, तर त्यांना संसदीय दलाचे नेते केले असते, असेही चिराग यांनी स्पष्ट केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

“भाजप आणि RSS ने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

वडिलांच्या निधनानंतर लगेचच निवडणुका आल्या

८ ऑक्टोबर रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले आणि लगेचच निवडणुका लागल्या. तो काळ आमच्यासाठी कठीण होता. मात्र, जनतेने आम्हाला चांगला पाठिंबा दिला. २५ लाखांहून अधिक मते आम्हांला मिळाली, असे सांगत जदयुमुळे आम्ही युतीतून बाहेर पडलो आणि स्वबळावर निवडणुका लढलो, असे चिराग यांनी नमूद केले. आमचा विरोध नितीश कुमार यांच्या धोरणांना होता. म्हणून आम्ही संघर्ष करण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

काकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला

होळीच्या सणाला आमचे कुटूंब एकत्र नव्हते. काकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सफल झाला नाही. पक्षाच्या संविधानानुसार, खुद्द राष्ट्रीय अध्यक्षच संसदीय दलाच्या नेत्याची नियुक्त, निवड करू शकतो. काकांनी इच्छा व्यक्त केली असती, तर त्यांना संसदीय दलाचे नेते केले असते. तसेच पक्षाच्या नियमांनुसार, ते आताही राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच, असे चिराग यांनी म्हटले आहे. 

“उत्तर प्रदेशवासीयांची बदनामी थांबवा, सत्य बोला”; योगी आदित्यनाथांनी राहुल गांधींना सुनावले

दरम्यान, मी रामविलास पासवान यांचा मुलगा आहे. मी आधी कधी घाबरलो नाही, आताही घाबरणार नाही. जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. जनता दल युनायटेडकडून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा चिराग पासवान यांनी यावेळी बोलताना केला. 
 

Web Title: chirag paswan says all of this had conspired when I was not well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app