शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 06:06 IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकात बोलल्यासारखे होते. सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलायचे असते हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. वीज कनेक्शन कापण्यापासून कृषी विम्यापर्यंतच्या एकाही मुद्द्यावर ते बोलले नाहीत, त्यांनी राज्यातील जनतेचा पूर्णत: भ्रमनिरास केला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अमेरिकेपासून काश्मीर-कन्याकुमारीपर्यंत मुख्यमंत्री फिरून आले पण महाराष्ट्रावर काहीच समाधानकारक बोलले नाहीत. त्यातच त्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकात बोलल्यासारखे होते. सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलायचे असते हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. वीज कनेक्शन कापण्यापासून कृषी विम्यापर्यंतच्या एकाही मुद्द्यावर ते बोलले नाहीत, त्यांनी राज्यातील जनतेचा पूर्णत: भ्रमनिरास केला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस म्हणाले की, ‘चीनसमोर आला की पळे’ हे मुख्यमंत्र्यांचे विधान सैनिकांचा अपमान करणारे आहे. उणे ३० च्या तापमानात देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनी एक इंचही जमीन चीनला मिळू दिली नाही, मग मुख्यमंत्री असे विधान कसे काय करू शकतात?  

आमच्या हिंदुत्वावर शंका घेऊ नकाnगृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उसने अवसान आणून बोलले. सत्य काय ते त्यांना माहिती आहे. खोटं बोला पण रेटून बोला हे मुख्यमंत्र्यांचे नवे रुप बघायला मिळाले असे फडणवीस म्हणाले. nशिवसेना स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हती हे मुख्यमंत्री म्हणाले पण सोबतच त्यांनी रा. स्व. संघाचा उल्लेख केला. संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे स्वत:च स्वातंत्र्यसैनिक होते. nआमच्या हिंदुत्वावर शंका घेणारे मुख्यमंत्री हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, हे कुठले हिंदुत्व, असा सवाल फडणवीस यांनी केला. nहिंदुंचा अपमान करणाऱ्या शर्जिल उस्मानीची उत्तर प्रदेशात हिंदुंविरुद्ध गरळ ओकण्याची हिंमत झाली नाही, त्यासाठी तो महाराष्ट्रात येऊन बोलला, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेIndian Armyभारतीय जवान