शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

छत्तीसगडमध्ये गटबाजी, नाराजीच्या लाटेत फसली भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 03:50 IST

काँग्रेसच्याही जिल्हानिहाय बैठका; विधानसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस

- साहेबराव नरसाळेसलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकांत अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले. या पराभवाची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांवर ढकलल्याने भाजपात गटबाजी उफाळली आहे़ हे वादळ शमले नसतानाच पराभूत नेत्यांवरच भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविल्याने आता ही ‘भारतीय पराभूत पार्टी’ झाली, अशी टीका नाराज करु लागले आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ११ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे़ या मतदारसंघांची विभागणी रायपूर, बस्तर, बिलासपूर या तीन विभागांमध्ये केली जाते. त्यासाठी भाजपाने प्रभारी नियुक्त केले आहेत़ रायपूर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री राजेश मुनोत, बस्तर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री केदारनाथ कश्यप, बिलासपूर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री अमर अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे़ हे तीनही प्रभारी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत.भाजपाने प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याने तिथे नाराजी आहे़ कौशिक यांची एकतर्फी निवड केल्याने काही आमदार नाराज आहेत. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवनारायण द्विवेदी यांनी राजीनामा दिला असून, ते काँगे्रसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.काँगे्रसमधून बाहेर पडून जनता काँगे्रस पक्ष स्थापन केलेल्या अजित जोगी यांनाही बंडखोरांनी ग्रासले आहे़ जनता काँगे्रसचे वरिष्ठ नेते अब्दुल हमीद हयात व बृजेश साहू यांची बंडखोरीमुळे हकालपट्टी करण्यात आली़ याच पक्षाचे सियाराम कौशिक, चंद्रभान बारमते, चैतराम साहू, संतोष कौशिक हे नेते काँगे्रसच्या संपर्कात आहेत. ते २८ जानेवारी रोजी काँगे्रसमध्ये प्रवेश करतील, या शक्यतेला काँगे्रसचे प्रभारी पी़ एल़ पुनिया यांनी दुजोरा दिला आहे.लोकसभेच्या तयारीसाठी काँगे्रसच्या बैठका सुरु आहेत. पण विधानसभेतील विजयामुळे काँगे्रसमध्येही गटबाजी आहे़ ‘प्रत्येक पक्षात बंडखोरी असतेच’, असे सांगत आरोग्यमंत्री टी़ एस़ सिंहदेव यांनी ही समस्या आमच्याकडे असल्याचे मान्य केले. मात्र काँग्रेसमधील कोणीही नेता बंडखोरी करणार नाही, असा दावा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला.जनता काँग्रेस व बसपाची युतीलोकसभेसाठी अजित जोगी यांची जनता काँगे्रस व बसपाची युती आहे़ जनता काँगे्रसला ७ व बसपाला ४ जागा असा फॉर्म्युला ठरला आहे़ याची माहिती जनता काँगे्रसने दिली़ मात्र, बसपाने त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही़एकाच जागेच्या विजयाचा इतिहास पुसणार?मध्यप्रदेशचे विभाजन करून नोव्हेंबर २००० मध्ये छत्तीसगडची निर्मिती करण्यात आली़ त्यानंतर काँगे्रसचे अजित जोगी हे पहिले मुख्यमंत्री झाले़ पण २००३ सालच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत भाजपने ५० जागा जिंकून काँगे्रसला धूळ चारली़मुख्यमंत्री झालेल्या रमण सिंह यांनी छत्तीसगडमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले़ महासमुंदमधून २००४ च्या लोकसभा निवडणुकीत महासमुंद अजित जोगी हे एकमेव काँगे्रस उमेदवार निवडून आले, तर २००९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला पुन्हा एकाच जागेवर रोखले़दुर्गमधून २०१४ साली दुर्ग काँगे्रसचे ताम्रध्वज साहू हे एकटेच विजयी झाले़ म्हणजेच तीन लोकसभा निवडणुकांत काँगे्रस एका जागेवरून पुढे सरकली नाही. या एका जागेचा इतिहास पुसण्याचे आव्हान काँगे्रसपुढे आहे़

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस