शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

भाजप मार्गदर्शकांच्या नावे फसवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:49 IST

भाजपचे मार्गदर्शक व कानपूरचे विद्यमान खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या एका पत्राने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपचे मार्गदर्शक व कानपूरचे विद्यमान खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या एका पत्राने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लिहिलेल्या या पत्रात भाजपने जोशी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा, तसेच लोकशाहीवादी मूल्ये पायदळी तुडविल्याचा आरोप केला आहे. याबरोबरच या दोन्ही नेत्यांच्या अपमानाचाही यात उल्लेख आहे. तथापि, जोशी यांच्या कार्यालयाने हे पत्र फेटाळून लावले आहे.हे पत्र जारी करणाऱ्यांनी वृत्तसंस्थांच्या लोकांचाही वापर केला; परंतु संस्थांनी हा आरोप फेटाळून लावला. भाजपने या दोन्ही संस्थापक सदस्यांना या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेली नाही. आपल्याला तिकीट दिले जाणार नाही, हे स्पष्ट होताच जोशी यांनी आपल्या कानपूर मतदारसंघातील मतदारांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले होते व तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अडवाणी व जोशी या दिग्गज नेत्यांनी पक्षाच्या स्थापनादिनी भेटही घेतली होती. त्यावेळी हे दोन्ही नेते पक्षातील घडामोडींवर काही कठोर प्रतिक्रिया देतील, अशी चर्चा होती.

पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आलेले हे पत्र प्रथमदर्शनी खरे मानण्यात आले होते. हे पत्र जोशींच्या अधिकृत लेटरहेडवर जारी केले होते. त्यावर १२ एप्रिल २०१९ ही तारीखही लिहिलेली आहे. या पत्राचा खरे-खोटेपणा जाणून घेण्यासाठी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही; परंतु अशा प्रकारचे कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नाही, असे त्यांच्या कार्यालयाने सांगितले.
>अडवाणींनीही साधला निशाणाअडवाणी यांनी यापूर्वी एका ब्लॉगच्या माध्यमातून पक्षाच्या विद्यमान कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकशाही मूल्यांची आठवण करून देत म्हटले होते की, भाजपने प्रतिस्पर्ध्यांना कधीच देशद्रोही मानलेले नाही.>भाजपला बदनाम करण्याचा कट : निवडणुकीच्या काळात भाजपला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांनी हा कट रचला आहे, असा आरोप भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. यातून पक्ष व नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे; परंतु जनतेने हा कट ओळखला आहे, असेही ते म्हणाले.>अडवाणींचे बनावट टिष्ट्वटरकाही दिवसांपूर्वीच अडवाणींच्या नावाने एक टिष्ट्वटर अकाऊंट समोर आले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कामकाजाचे कौतुक करण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते फॉलोही करीत आहेत. तथापि, अडवाणी यांच्या कार्यालयाने हे बनावट असल्याचे सांगत ते बंद करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा