शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी, लोकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 19:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराला सुरुवात केली असून, ते बिहारमधल्या गया येथे सभेला संबोधित करत आहेत.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराला सुरुवात केली असून, ते बिहारमधल्या गया येथे सभेला संबोधित करत आहेत. मोदी रॅलीला संबोधित करत असतानाच लोकसभा निवडणुकीच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीदरम्यान लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आहेत. ढिसाळ नियोजनामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोदींनी एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी गयामध्ये जनतेला संबोधित केलं. त्यावेळी सभास्थळी ठेवलेल्या खुर्च्या कमी पडल्या आणि चेंगराचेंगरी झाली. दरम्यान काहींनी एकमेकांवर खुर्च्याही फेकल्या. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. रॅलीदरम्यान दोन गट एकमेकांना शिवीगाळ करत होते, त्यानंतर ते हाणामारीवर उतरले. म्हणून सभेच्या इथली परिस्थिती बिघडली. लोक खुर्च्या उचलून एकमेकांच्या दिशेनं फेकू लागले.रॅलीमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी एकमेकांच्या डोक्यात त्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या घातल्या. त्यानंतर काही जणांनी सभा स्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ सभेच्या स्थळावर येत जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgaya-pcगेलेBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019