शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार लुटारू आणि खोटारडे- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:05 IST

कसाऱ्यातील जाहीर सभेत टीका

कसारा : काळे पैसेवाल्यांना लुटण्यासाठी नोटा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, हे सरकार लुटारू व खोटारडे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी कसारा येथील जाहीर सभेत केला.शहापूर तालुक्यातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे येथे कायम पाणीटंचाई असते. त्यामुळे येथे सिंचन योजना राबवता येत नाहीत. येथील लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती नसल्याने येथील जमीन ओसाड पडली आहे. ग्रामीण भागाची भौगोलिक परिस्थिती पाहता, येथे कृषीवर आधारित व्यवसाय सुरू करून येथील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्याची गरज आहे. या भागात दुग्धसंकलन केंद्र व भाजीपाला व्यवसाय सुरू केल्यास येथे मोठी बाजारपेठ निर्माण होऊन जोडव्यवसाय आणि रोजगारनिर्मिती होऊ शकते; पण शासन त्यानुसार योजनाच राबवत नसल्याने येथील लोक शहराकडे रोजगारासाठी जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. सभेला भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाढविंदे, कसारा शहराध्यक्ष अमीर भरीत, प्रकाश घेगडे व एमआयएमचे कार्यकर्ते उपस्थित होते.आजी, माजी खासदार धनदांडग्यांचेभिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिल पाटील व माजी खासदार सुरेश टावरे यांच्यावर टीका करताना, काँग्रेसच्या राजवटीत खासदार टावरे यांनी फक्त स्वत:चा विकास केला. गोरगरीब, शेतकरीवर्गासाठी काहीही केले नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. सुरेश टावरे यांना जाणीव असती, तर त्यांनी किमान एखादा दुग्ध प्रकल्प या भागात उभारला असता. त्यामुळे उत्तर प्रदेश, गुजरातहून महाराष्ट्राला होणारा दूधपुरवठा बंद झाला असता आणि येथील शेतकरी समृद्ध झाले असते, असे आंबेडकर या वेळी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा