शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पनवेल ठरतेय मावळच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:43 IST

घाटाखालील मतेच ठरणार निर्णायक; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

नवी मुंबई : राज्यातील लक्षवेधी लढतीमध्ये मावळचा समावेश आहे. सर्वाधिक मतदार असल्यामुळे पनवेल या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला आहे. निवडणुकीमध्ये घाटाखालील तीन मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार असल्यामुळे या परिसरामध्ये सभांचा विक्रम होऊ लागला असून, आघाडीसह युतीच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.पनवेलमध्ये मंगळवारी शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी काँगे्रस व राष्ट्रवादीच्या आघाडीला खिचडीची उपाधी देऊन बारामतीचे पार्सल परत पाठवून देण्याचे आवाहन केले. आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली. आरोप-प्रत्यारोपांमुळे पनवेलचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मावळ मतदारसंघामध्ये २२ लाख २७ हजार मतदार आहेत. यामधील घाटावरील चिंचवड, पिंपरी व मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये ११ लाख ५० हजार ७०५ व घाटाखालील पनवेल, उरण व कर्जत मतदारसंघामध्ये १० लाख ७७ हजार २८ मतदार आहेत. दोन्ही प्रमुख उमेदवार घाटावरील असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची संघटनात्मक बांधणीही मजबूत आहे; परंतु घाटाखालील मतदारसंघामध्ये शिवसेनेला भाजपवर व राष्ट्रवादीला शेतकरी कामगार पक्षावर अवलंबून राहावे लागत आहे. मित्र पक्षाच्या ताकदीच्या आधाराने निवडणूक लढविली जात असल्याने दोन्हीकडून या परिसरावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.घाटाखालील तीनही मतदारसंघांमध्ये पनवेल हा केंद्रबिंदू झाला आहे. सर्वाधिक ५ लाख १४ हजार मतदान या ठिकाणी आहे. याठिकाणी शरद पवार यांनी दोन सभा घेतल्या आहेत. अजित पवार यांनी सर्वाधिक लक्ष या परिसरावर दिले आहे. स्वत: विविध ठिकाणी सभा घेतल्या आहेत. युतीच्या प्रचारासाठी स्वत: मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने चुरस वाढली आहे. पनवेलसह घाटाखालील तीनही मतदारसंघांमधून ज्यांना लीड मिळणार त्यांचा विजयाचा मार्ग सोपा असल्यामुळेच सर्वांनी येथे लक्ष केंद्रित केले आहे. आता येथील नागरिक नक्की कोणाच्या पारड्यात मते टाकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.राष्ट्रवादीसाठी आतापर्यंतची उपस्थितीशरद पवार, अजित पवार, गणेश नाईक, सुनेत्रा पवार, धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, बाळाराम पाटील, अमरसिंह पंडित, जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील, नवाब मलिक, चित्रा वाघ, नीलेश लंके, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माणिकराव जगताप यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे.युतीसाठीची उपस्थितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार रामशेठ ठाकूर,सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार मनोहर भोईर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हण यांनीही हजेरी लावली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळpanvelपनवेलparth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना